शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोन वर्षांची शिक्षा

By admin | Published: August 15, 2015 12:14 AM

देसाईगंजच्या तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विष्णू राजाराम वैरागडे

मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण : देसाईगंज येथील पॅथालॉजी संचालक गोत्यातगडचिरोली : देसाईगंजच्या तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी विष्णू राजाराम वैरागडे रा. देसाईगंज (४०) याला जिल्हा सत्र व दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांची शिक्षा व दोन हजार रूपये दंड ठोठावला आहे. देसाईगंज येथील विष्णू पॅथालॉजी चालक विष्णू राजाराम वैरागडे याच्याकडे असलेल्या डीएमएलटी या पदविकेची मूळ कागदपत्रे तपासावे, असे निर्देश तत्कालीन महिला मुख्याधिकारी यांना प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी वैरागडे याला मूळ कागदपत्र तपासणीबाबतचे पत्र दिले. मात्र वैरागडे याने मूळ कागदपत्रे सादर न करता ३१ मे २०१० रोजी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत नगर परिषदेच्या आवक/जावक विभागात सादर केले. मूळ कागदपत्रांसह नगर परिषदेत उपस्थित राहण्यास सांगितले असता, आरोपीने फिर्यादीसह मोबाईलवरून जातीवाचक शिवीगाळ केली. कागदपत्रे तपासणीसाठी मुख्याधिकारी त्या ठिकाणी गेल्या असता, त्यांचा विनयभंगसुध्दा केला. या प्रकरणाची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. याबद्दलचा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला. या खटल्याचा शुक्रवारी निकाल लागला असून न्यायालयाने आरोपी विष्णू वैरागडे यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्षांची शिक्षा, कलम ३५४ अंतर्गत सहा महिने व ३५३ अंतर्गत सहा महिने असे एकूण दोन वर्षांची शिक्षा व दोन हजार रूपयांचा दंड सुनावला. सदर शिक्षा अप्पर सत्र न्यायाधिश यु. एम. पदवाड यांनी सुनावली. सरकारी पक्षातर्फे सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)