लोकमत न्यूज नेटवर्क घोट (गडचिरोली ) : भरधाव दुचाकीची रस्त्याच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला जबर धडक बसली. या धडकेत मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील दोन युवक जागीच ठार झाले, तर एक युवक गंभीररीत्या जखमी झाला आहे. सदर अपघात घोट- आष्टी मार्गावरील नरेंद्रपूर गावच्या वळणावर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता घडला. चेतन कावळे (२५), जितेंद्र चौधरी (२५) अशी मृतकांची नावे आहेत. तर सागर मंदारे (२४) असे जखमी युवकाचे नाव आहे. हे तिघेही फिस्कुटी येथीलच रहिवासी आहेत. तिघेहीजण दुचाकीने फिरायला आले होते. जामगिरीवरून सुभाषग्राम मार्गे घोटकडे येत होते. नरेंद्रपूर गावजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला धडकली. अपघाताबातची माहिती मिळताच घोट पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला रूग्णालयात भरती केले. पुढील तपास प्रभारी अधिकारी सुरेश जायभाई करीत आहेत.
दुचाकीच्या अपघातात दोन युवक जागीच ठार
By admin | Published: June 10, 2017 1:35 AM