वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:01:00+5:30

देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही.

The UK reminded the government of two crore jobs annually | वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविले निवेदन : देसाईगंज, कोरची, आरमोरी, सिरोंचा येथील कार्यकर्ते एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वार्षिक दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीपूर्वी देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने रोजगार न देता असलेल्या नोकऱ्या हिरावल्या. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पाळत वार्षिक दोन कोटी रोजगार द्यावा, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसने जिल्हाभर तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला पाठविले.
देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही. उलट शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे नोकºया गेल्या, केंद्र शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा हट्ट धरला आहे. तसेच नीट व जेईई परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गरीबांना मदत व उद्योगांना पॅकेजसुद्धा दिले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना युकाँ शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, लतीफ रिजवी, नितीन घुले, सुनील सहारे, विक्की सिडाम, भारत गराडे, राकेश पुरणवार, विवेक गावळे, भूषण राऊत, प्रदीप बगमारे, नामदेव पत्रे, रितेश नागदेवे उपस्थित होते.
कोरची येथे तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल अंबादे, शहर अध्यक्ष मनोज सोनकुकरा, विरेंद्र जमकातन, रोशन कपुरडेरिया, आमीर शेख, देवा हारमे, ओमप्रकाश सुवा, चिंता सोनफुल, जितेंद्र विनायक, लवकुमार हारणे, परमेश्वर लोहंबरे उपस्थित होते.
आरमोरी येथे तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगाराच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, विधानसभा क्षेत्र महासचिव नीलेश अंबादे, सारंग जांभुळे, सूरज भोयर, अक्षय मैंद, हेमचंद्र माकडे, संजय दुधबळे, अतुल सोमनकर, चेतन सोमनकर, तुषार नैताम, महेंद्र मने, भूपेश वाकडे, निखिल दुमाने, गोपाल रंधये, शुभम दुगा, खेमचंद्र चाटारे, रूपेश जवंजाळकर उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले.
सिरोंचा येथे तहसीलदार रमेश जसवंत यांच्यामार्फत पंतप्रधानांना युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन पाठवून वार्षिक दोन कोटी रोजगार निर्मितीची मागणी करण्यात आली. निवेदन देताना युवक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आकाश परसा, तालुका उपाध्यक्ष नवाज सय्यद, दिनेश रेवेली, जतीन आदेपू, हरीष भट्टी, पवन येलेश्वरम, अभिलाष भट्टी आदी युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: The UK reminded the government of two crore jobs annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.