शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:47 AM

स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली.

ठळक मुद्दे११९ साहित्य जप्त : पालिकेची दोन दिवसांपासून धडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागाच्या पथकाने शनिवारी शहरातील बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक व धानोरा व चामोर्शी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई केली. पक्षांचे अनधिकृत बॅनर, खासगी होर्डिंग्ज, पक्षांचे झेंडे, तोरण आदी मिळून एकूण ११९ साहित्य ट्रॅक्टरमध्ये टाकून नगर पालिकेत जप्त केले आहे.गडचिरोली शहराच्या मोक्याच्या जागेवर तसेच मार्गालगत होर्डिंग्ज व बॅनर लावण्यासाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. नगर पालिकेने ठरलेल्या दराची रक्कम अदा करून होर्डिंग्ज व बॅनर लावले जातात. मात्र नगर पालिकेचे यापूर्वी दुर्लक्ष झाल्याने शहरातील इंदिरा गांधी चौक तसेच चारही मुख्य मार्गावर अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज तसेच पक्षाचे तोरण व झेंडे लावल्या जात होते. अशा प्रकारच्या अनधिकृत व बॅनर होर्डिंग्जमुळे इंदिरा गांधी चौकाला विद्रुप स्वरूप येत होते. या संदर्भात माध्यमांनी अनेकदा वृत्त प्रकाशित करून नगर परिषद प्रशासनाला जागे केले होते. मात्र धडक कारवाई राबविण्यात आली नाही.दरम्यान नगर पालिकेचे कर विभाग म्हणून नव्याने रूजू झालेल्या रवींद्र भंडारवार यांनी पुढाकार घेऊन शनिवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर काढण्याची कारवाई हाती घेतली. शनिवारी सकाळी ९ वाजतापासून नगर पालिकेने ही कारवाई हाती घेतली. ज्यांनी अधिकृतपणे परवानगी न घेता बॅनर व होर्डिंग्ज लावले, असे सर्व होर्डिंग्ज काढून जमा करण्यात आले. या कारवाईदरम्यान कर विभागाचे कर्मचारी सुनील पुण्यप्रेडीवार व मजुरांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे, सदर कारवाईदरम्यान शहरात केवळ अधिकृतपणे लावलेले १२ होर्डिंग्ज व बॅनर आढळून आले.असे आहेतपालिकेचे दरअधिकृतपणे लावावयाच्या बॅनर, पोस्टर व होर्डिंग्जसाठीचे दर पालिकेने निश्चित केले आहेत. एका वर्षासाठी मोठे बॅनर लावल्यास १० हजार रुपये आकारले जातात. मध्यम आकाराच्या बॅनरला वर्षाकाठी सात हजार रुपये आकारले जातात. चार बाय सहा आकाराच्या लहान बॅनरला वर्षाकाठी पाच हजार रुपये घेतले जातात. दिवसानुसारही पालिकेने याचे दर निश्चित केले आहेत. एका दिवसासाठी लहान बॅनरला २५ रुपये आकारले जातात. याचा आकार ५० स्केअरफुट असणे आवश्यक आहे. १०० ते १५० स्केअरफुट आकाराच्या बॅनरला प्रती दिवस ५० रुपये प्रमाणे दर आकारला जातो.धडक कारवाई सुरूच राहणारअनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर लावण्याचे प्रमाण गडचिरोली शहरात मोठे आहे. आजपर्यंत पालिकेच्या वतीने अशा प्रकारची धडक मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे १०० वर अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर इंदिरा गांधी चौक, बसस्थानक व चारही मुख्य मार्गावर लावण्यात आले होते. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनंतर भंडारीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात पाहणी केली. यावेळी जागोजागी अनधिकृत होर्डिंग्ज लागले असल्याचे दिसून आले. अनधिकृत होर्डिंग्ज लावण्याची कारवाई आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे, अशी माहिती कर विभाग प्रमुख तथा नोडल अधिकारी रवींद्र भंडारवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.आचारसंहितेच्या शक्यतेने कारवाईलोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात घोषित होणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. तशी तयारीही जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या नगर विकास विभागाने पालिकेला होर्डिंग्ज व बॅनर हटविण्याचे सूचित केले. त्यामुळे पालिकेच्या वतीने ही कारवाई हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. सदर कारवाई नियमितपणे राबवावी, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका