लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथे काही दिवसांपूर्वी दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटना तयार झाली. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असला तरी अनेक महिलाच दारूची विक्री करीत होत्या. अशा सहा दारूविक्रेत्या महिलांच्या घरी धाड टाकून गाव संघटनेने दारू जप्त केली. तसेच त्यांची पोलिसांत तक्रार करीत गावात सभा घेऊन त्यांना दारूविक्री न करण्याबाबत अल्टिमेटम देण्यात आला.देलनवाडी येथे मोठ्या प्रमाणात दारूविक्री होते. मुक्तिपथ चमूने गावाला वारंवार भेटी देऊन येथील नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगत गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी प्रवृत्त केले. दारूमुळे होत असलेला त्रास लक्षात घेत येथे गाव संघटन सक्रीय झाले. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता. परंतु गावातील काही महिलाच सर्रास दारूविक्री करीत होत्या. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शुक्रवारी गाव संघटनेने सहा महिलांच्या घरी धाड टाकून त्यांच्याकडील दारूसाठा जप्त केला. तसेच आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रारही केली. या महिलांवर वचक राहण्यासाठी लगेच दुसऱ्या दिवशी गाव संघटनेने मुक्तिपथ तालुका चमू, गावातील नागरिक, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, बीट जमादार मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गावातील दारूविक्री बंद करण्यास सहकार्य करण्याची विनंती केली. देखमुख यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सभेदरम्यान जवळच्या गाव शिवारात दारू गाळली जात असल्याची माहिती गाव संघटनेला मिळाली. महिलांनी तत्काळ तिथे जाऊन मोहसडवा, दारू आणि साहित्य जप्त करून नष्ट केले.सहा महिलांकडून पकडलेल्या दारूचाही पंचनामा करण्यात आला. दारूविक्रेत्या महिलांना कारवाईचा अल्टिमेटम देण्यात आला.सभेला पं. स. सदस्य किरण मस्के, सरपंच माणिक पेंदाम, उपसरपंच ज्योती किरंगे, पोलीस पाटील कोमल धुर्वे आदींसह गावसंघटनेचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.इंजेवारी, पेठतुकूम येथे १ फेब्रुवारीपासून खर्रा विक्री बंदइंजेवारी आणि पेठतुकूम येथे काही दिवसांपूर्वी खर्राविक्रीबंदीचा ठराव घेण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक परजने यावेळी उपस्थित होते. त्यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगून कोटपा कायद्याची माहिती उपस्थितांना दिली. या बैठकीत गावातील पानठेलेधाराकांना तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्राविक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या असता विक्रेत्यांनी काही दिवसांची मुदत मागितली. त्यांची बाजू लक्षात घेत विक्रेत्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली. या मुदतीनुसार १ फेब्रुवारीपासून गावातील तंबाखूजन्य पदार्थ आणि खर्राविक्री बंद असणार आहे.
अवैैध दारू अड्ड्यांवर महिलांनी टाकली धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:52 PM
तालुक्यातील देलनवाडी येथे काही दिवसांपूर्वी दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटना तयार झाली. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असला तरी अनेक महिलाच दारूची विक्री करीत होत्या. अशा सहा दारूविक्रेत्या महिलांच्या घरी धाड टाकून गाव संघटनेने दारू जप्त केली. तसेच त्यांची पोलिसांत तक्रार करीत गावात सभा घेऊन त्यांना दारूविक्री न करण्याबाबत अल्टिमेटम देण्यात आला.
ठळक मुद्देसहा दारूविक्रेत्यांची पोलिसांत तक्रार : देलनवाडीत मोहफूल सडव्यासह दारू व अन्य साहित्य केले नष्ट