३१ सदस्य झाले सभागृहात हजर : काँग्रेसच्या सहकार्याने गण्यारपवार, कंकडालवार तरलेगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मंगळवारी फेटाळण्यात आला. या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला प्रचंड तडाखा बसला आहे. भाजप चारही मुंड्या चित झाल्याची भावना सर्वत्र उमटली आहे.गडचिरोली जिल्हा परिषदेत मागील दोन महिन्यांपासून अविश्वास प्रस्तावाचे नाट्य सुरू आहे. त्या नाट्यांतर्गत दुसरा अंक मंगळवारी समाप्त झाला. गण्यारपवार, कंकडालवार यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. हा प्रस्ताव पारित करण्यासाठी ३४ सदस्यांचे संख्याबळ सभागृहात उपस्थित असणे आवश्यक होते. दुपारी १ वाजता वीर बाबुराव शेडमाके सभागृहात सभा सुरू झाली. परंतु प्रत्यक्ष सभागृहात ३१ सदस्य हजर होते. सभागृहात तीन अधिक सदस्यांचे संख्याबळ जुळविण्यात अविश्वास दाखल करणाऱ्यांना अपयश आल्याने गण्यारपवार, कंकडालवार यांची खुर्ची बचावली. ३१ सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात मतदान घेण्यात आले. ३१ विरूध्द शुन्य मतदान प्रस्तावावर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा परिषदेत अविश्वास प्रस्ताव बारगळल्यानंतर गण्यारपवार, कंकडालवार व काँग्रेस समर्थकांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)
अविश्वासात भाजप चारीमुंड्या चित
By admin | Published: October 14, 2015 1:46 AM