विवेक बेझलवार ।लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तत्कालीन शासक निजामशाहने प्राणहिता नदीवर देवलमरी गावाजवळ जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या अडचणींमुळे जलविद्युत प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. प्रकल्प निर्मितीची साक्ष देणारा सिमेंटचा पिल्लर आजही या ठिकाणी कायम आहे.इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते. याच ठिकाणी पिल्लर तयार करण्यात आला. सदर पिल्लर आजही बांधकाम निर्मितीच्या शुभारंभाची साक्ष देत आहे. मात्र प्रकल्पाचे काम पुढे गेले नाही. निजामशाहीनंतर आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती झाली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बर्मुला रामकृष्णराव असताना १९५२-५४ मध्ये जवळपास अनेक दिवस सर्वेक्षण करण्यात आले, असे स्थानिक व वयोवृध्द नागरिकांचे म्हणणे आहे. १९५५ मध्ये काही यंत्र सामग्री व उपकरणे या ठिकाणी आणली गेली. मात्र काम पुढे गेले नाही. २००७ मध्ये संयुक्त पुरोगामी सरकारच्या काळात एपी जेंको अधिकाऱ्याने तलाई येथील प्राणहिता नदीला भेट दिली. या ठिकाणी १०० मेगावॅटचा वीज प्रकल्प निर्माण केला जाईल, असे जेंको यांनी सांगितले होते. मात्र त्याकडे तत्कालीन सरकारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही.महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्यांसाठी ठरू शकते लाभदायकप्राणहिता नदी महाराष्टÑ व तेलंगणा राज्याची दुभाजक आहे. पुढे ही नदी गोदावरी नदीला जाऊन मिळते. प्राणहिता नदी बारमाही वाहणारी नदी आहे. त्यामुळे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती झाल्यास विजेची समस्या दूर होईल. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यास मदत होईल. प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यायोग्य वातावरण आहे. आवश्यक तेवढे पाणी आहे. हे आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे. त्यामुळे तेलंगणा व महाराष्टÑ सरकारने संयुक्तपणे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प निर्माण केल्यास दोन्ही राज्यांची विजेची गरज पूर्ण होण्यास मदत होईल.अहेरी परिसरातील गावे जंगलाने व्यापले आहेत. अतिशय दूरवरून या गावांना वीज पुरवठा केला जातो. तसेच तेलंगणा राज्यातीलही प्राणहिता नदीकाठी असलेल्या गावांमध्ये विजेची समस्या गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणी वीज प्रकल्प निर्माण झाल्यास दोन्ही राज्यातील विजेची समस्या दूर होण्यासाठी फार मोठी मदत होईल.
निजामकालीन प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प अधांतरीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:00 AM
इंग्रजकालीन राजवटीत तेलंगणा राज्यात निजामाचे स्वतंत्र राज्य होते. इंग्रजांनी देशात जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केली होती. त्यांचे अनुकरण करीत निजामशाहनेही प्राणहिता नदीत जलविद्युत प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले. सर्वेक्षणानंतर प्रकल्प निर्मितीच्या कामाला सुरूवात केली. प्राणहिता नदीच्या अगदी मध्यभागी अजुनही बारमाही पाणी राहते.
ठळक मुद्देप्राणहिता नदीतील खांब देत आहे साक्ष : कामाला झाली होती सुरूवात; परिसरातील नागरिकांना मिळू शकते रोजगार