बारावी विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग खुला हाेताे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रमुख सहा शाखा आहेत. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल्स, मेकॅनिकल, सिव्हील, काॅम्प्युटर सायन्स व केमिकल आदींचा समावेश आहे. या प्रमुख शाखांच्या अनेक उपशाखा आहेत. विज्ञान शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जेईई ही प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. या परीक्षेत अधिकाधिक गुण मिळल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील चांगली शाखा मिळते. शासनातर्फे दरवर्षी जेईई परीक्षा घेतली जाते. जानेवारी व एप्रिल महिन्यात अशी दाेनदा ही परीक्षा हाेत असते. मात्र काेराेना महामारीच्या कारणामुळे वर्षभरात चार वेळा जेईई परीक्षा घेतली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रानंतर विज्ञान शाखेतील अधिकाधिक विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशाकडे वळतात. मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून शासकीय नाेकऱ्या व राेजगार उपलब्ध हाेत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला आहे.
बाॅक्स
तयारी करणारे विद्यार्थी संख्या ३३५०
दरवर्षी प्रवेश मिळणारे विद्यार्थी संख्या १५०
तीन वर्षात शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ५००
काेट
गणित व भाैतिकशास्त्र विषय वगळून अभियांत्रिकी प्रवेशाला निर्णय देण्याचा निर्णय चुकीचा आहे. प्रवेश मिळूनही या क्षेत्रातील एबीसीडी माहित नसल्याने या शिक्षणाचा पाया कच्चा राहिल. अभियांत्रीकी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणेही कठीण जाईल. राज्यातील माेठ्या संख्येने असलेल्या अभियांत्रिकी काॅलेजला विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावे. राजकीय क्षेत्रात असलेल्या संस्था प्रमुखांचे काॅलेज चालावे, याकरीता हा चुकीचा निर्णय घेतला जात आहे.
- वैभव धात्रक, गडचिराेली
काेट
अभियांत्रिकी शिक्षणात गणित व भाैतिकशास्त्र विषय आवश्यक आहे. इयत्ता अकरावी, बारावीला हे विषय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश दिल्यास चार वर्षात अभियांत्रिकीच्या परीक्षा उत्तीर्ण हाेणे कठीण आहे. संबंधित विद्यार्थी पास झाला तरी गुणवत्ता राहणार नाही. परिणामी अभियांत्रिकीची पदवी घेऊनही असे विद्यार्थी स्पर्धेत टिकणार नाही.
- ए.व्ही.एस. शर्मा, गडचिराेली
बाॅक्स
डीएड्, बीएड् काेर्ससारखी परीस्थिती
काही वर्षापूर्वी शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डीएड व बीएड या अभ्यासक्रमाला महाराष्ट्रात प्रचंड मागणी व स्काेप हाेता. मात्र काॅलेजच्या संख्येनुसार डीएड व बीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बेराेजगार विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. परिणामी गेल्या १० वर्षात शिक्षकांच्या तेवढ्या जागा निर्माण झाल्या नाही. परिणामी बेराेजगारीने हे विद्यार्थी हैराण झाले. अशीच परिस्थिती आता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची झाली आहे. इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करूनही हाताला काम नाही, नाेकरी नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अभियांत्रीकीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी पुढे येत नाही. परिणामी जागा रिक्त राहून काही महाविद्यालय ओस पडत आहे.
गाेंडवानात एकच काॅलेज
गाेंडवाना विद्यापीठ गडचिराेली अंतर्गत चंद्रपूर येथे एकमेव शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय आहे. येथे सहा शाखा असून साडेतीनशेवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.