लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. २ येथे आटाचक्की सुरू करुन दळण दळत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून चक्कीच्या मालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घडली.देवाजी गोविंदा सुरकर (६५) वर्षे रा. मुधोली चक नं. २ असे मृताचे नाव आहे. देवाजी सुरकर यांनी जोडव्यवसाय म्हणून आटाचक्की सुरू केली होती. बुधवारी देवाजी यांनी नारळ फोडून व पूजापाठ केली. चक्कीला सुरू करण्यासाठी गेले असता विजेचा जबर धक्का लागून ते खाली कोसळताना छतावर असलेल्या मुलास आवाज दिला. मुलाने खाली उतरून मीटरवरील वीज पुरवठा खंडित केला. मात्र तोपर्यंत ते जागेवरच मरण पावले होते.
पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी रवाना केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.