शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ऐक्य हीच समाजाची ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:16 PM

लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे.

ठळक मुद्देदिलीप तेली यांचे प्रतिपादन : चामोर्शीत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : लोकसंख्येने मोठा असलेल्या चामोर्शी तालुक्यात तेली समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. विखुरलेल्या समाजाला ऐक्याचे व्यासपीठ लाभने गरजेचे आहे. यामुळे समाजाचे ऐक्य टिकून राहते. ऐक्य हिच समाजाची ताकद आहे. या ताकदीचा वापर जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत समाजाचा आपला समाज पुढे जाणार नाही, असे प्रतिपादन विचारवंत दिलीप तेली यांनी केले.संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या वतीने ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज जयंती दिनानिमित्त समाज प्रबोधन व किर्तनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीक संजय येरणे, किर्तनकार तुषार सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, पं.स. सभापती आनंद भांडेकर, जि.प. सदस्य प्रा. रमेश बारसागडे, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, डॉ. राम वासेकर, प्रा. घनश्याम नैताम, डॉ. रवी नैताम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर, बंडूजी चिळंगे, रामभाऊ सातपुते, गजानन भांडेकर आदी उपस्थित होते.जयंतीनिमित्त चामोर्शी शहरातून सकाळी ९ वाजता बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जवळपास दोन हजार दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीचे दृश्य डोळ्याचे पारणे फिटणारे होते. कार्यक्रमादरम्यान प्रसिध्द विचारवंत संजय येरणे लिखीत ‘संताजी, यमुना, मेघनाथ साहा, ताई तेलीन’ यांचा कथाविचार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.किर्तनातून तुषार सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातूनच आपल्याला विकास साधता येईल. तसेच आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानावी, असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहूल नैताम तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले. मेळाव्याला जवळपास १० हजार समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी लोमेश बुरांडे, दीपक सोमनकर, कालिदास बुरांडे, रघुनाथ भांडेकर, ऋषी वासेकर, संजय कुनघाडकर, देविदास दुधबळे, आशिष पिपरे, धनंजय कोठारे, दिलीप चलाख, दिलीप सोमनकर, श्रीकृष्ण नैताम, रमेश नैताम, गुरूदेव सातपुते, निशांत नैताम, नरेश सोमनकर, प्रविण नैताम, गजानन बारसागडे, कैलास बोबाटे, महेंद्र किरमे यांच्यासह संताजी स्नेही महिला मंडळाचे सदस्य व पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कारकार्यक्रमादरम्यान दहावी व बारावीतील गुणवंतांचा शाल, श्रीफळ व संताजीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये बारावीतील प्रशांत पिपरे, प्रफुल्ल चलाख, खुशबू घोंगडे, आशिष जुवारे, हेमंत बोबाटे, आशिष वासेकर, नागेश्वर नैताम, संतोषी संजय कुनघाडकर, दहावीतील दीपक दशरथ गव्हारे, नंदिनी रवीकांत दुधबळे, आदर्श डोमदेव सातपुते यांचा समावेश आहे.