शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अवैैध तंबाखू व दारूविक्रेते होणार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 1:48 AM

वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

ठळक मुद्देवारंवार गुन्हा करणाऱ्यांवर कारवाई : त्रैैमासिक सभेत जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या त्रैमासिक सभेचे आयोजन गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. शिवनाथ कुंभारे, आनंद मोडक उपस्थित होते.बालसंरक्षण कायद्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन व्हावे, १८ वर्षाखालील कोणत्याही बालकाला तंबाखू किंवा तत्सम पदार्थ विकताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बाल संरक्षण कायद्याअंतर्गत १८ वर्षांखालील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकणे हा दंडनीय गुन्हा आहे. या कायद्यानुसार, लहान मुलांना तंबाखुजन्य पदार्थांची म्हणजे खर्रा, तंबाखू, नस, गुडाखू यांची विक्री करणाऱ्यास १ लाख रुपये दंड व सात वर्षांची सक्त मजुरी अशी शिक्षा आहे. त्या अनुषंगाने कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनीही विचार व्यक्त केले. बैठकीला पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पानठेल्यांची होणार नोंदणीजिल्हाभरात किती पानठेले आहेत, किती पानठेल्याची शॉप अ‍ॅक्टनुसार नोंदणी झाली आहे, याबाबतची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत व नगर परिषद/नगर पंचायत प्रशासनाकडून प्राप्त करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.