शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सोमवारपासून बेमुदत शाळाबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:36 PM

मागील १५ वर्षांपासून शासनाचा एकही रूपयाचे वेतन (मानधन) न घेता जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो उच्च माध्यमिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देविनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतकोरची : मागील १५ वर्षांपासून शासनाचा एकही रूपयाचे वेतन (मानधन) न घेता जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो उच्च माध्यमिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करूनही या कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्यात आले नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने ११ डिसेंबर सोमवारपासून शाळाबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे.यासंदर्भात विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने कोरचीच्या तहसीलदार कुमरे व गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाने अनुदान लागू करावे, या मागणीला घेऊन आतापर्यंत तब्बल २०४ वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र शासनाने अनुदानासंदर्भात शाळांची यादी तयार केली नाही. तसेच प्रत्यक्ष अनुदान लागू केले नाही. आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सदर प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षणमंत्र्यांचे हे आश्वासन हवेत विरले. आपल्या हक्कासाठी शिक्षक आता सोमवारपासून बेमुदत बंद पुकारणार आहेत. या बंदच्या कालावधीत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग पूर्णत: बंद राहणार आहेत, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.