२०१३ मध्ये विविध मागण्यांसह कनिष्ठ महाविद्यालयातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षकांनी राज्यव्यापी आंदाेलन केले हाेते. यातील काही मागण्या मंजूर झाल्या. परंतु कायम शब्द काढला नाही. २०१४ मध्ये केलेल्या आंदाेलनामुळे कायम शब्द काढण्यात आला. त्यानंतर अनुदान मिळावे, यासाठी संघटनेमार्फत संघर्ष करण्यात आला. दरम्यान विना अनुदानितची सेवा वरिष्ठ व निवड श्रेणीकरिता ग्राह्य धरणे व विना अनुदानावर अनुदानितमध्ये बदली करणे, आदी मागण्या आंदाेलनातून संघटनेने मान्य करून घेतल्या. शासनाच्या प्रतिकूल धाेरणाचा संघटनेने विराेध केला. वारंवार बैठका, निवेदने दिल्याने संघटनेला यश मिळाले. विना अनुदानित शिक्षकांसाठी १४० काेटींचा निधी वितरित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. परंतु प्रचलितनुसार अनुदान मिळावे व अघाेषितला अनुदानासह घाेषित करावे, जुनी पेंशन याेजना लागू करावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षकांनी तत्पर राहावे, असे आवाहन विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बाेरडे, महासचिव डाॅ. अशाेक गव्हाणकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भाऊराव गाेरे, जिल्हासचिव प्रा. विजय कुत्तरमारे, प्रा. धमेंद्र मुनघाटे यांनी केले आहे.
विना अनुदानित शिक्षकांचा वेतन निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM