लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/एटापल्ली : मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी महिला कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला कर्मचाºयांनी रस्त्यावर उतरून संप पुकारला आहे. मानधवाढीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाºयांचा हा संप कायमच राहील, असे सी-टू संलग्नित अंगणवाडी कमिटी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी स्पष्ट केले आहे.अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढी बाबतच्या विषयावर गडचिरोली व एटापल्ली येथे महिला कर्मचाºयांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. दहिवडे बोलत होते. गडचिरोली येथील मेळावा माया भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याला इंदूमती भांडारकर, भारती रामटेके, कार्तिक स्वामी कोवे, शालू बुर्रेवार, लता कडूकर, कुसूम नैताम, ज्योती कुद्रपवार, कुसूम नागोसे आदी उपस्थित होत्या.एटापल्ली येथील मेळावा गुलश शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रास्ताविक छाया कागदेलवार यांनी केले तर आभार राजश्री खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अनुसया झाडे, मंगला मोहुर्ले, नीलिमा बेडके, उमा मेडीवार, सुमन गावडे, लिनीग्रेस केरकट्टा आदींनी सहकार्य केले.यावेळी बोलताना प्रा. दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ ला गठित झालेल्या मनधनवाढ कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर १० जानेवारीला मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने ११ सप्टेंबरपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. अंगणवाडी महिलांच्या संपाकरिता अंगणवाडी महिला नव्हे तर शासनच जबाबदार आहे, असे रमेशचंद्र दहिवडे म्हणाले.
निर्णय होईपर्यंत महिलांचा संप कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:53 PM
मानधनवाढ कमिटीचे गठन केल्यानंतर या कमिटीच्या तीन बैठका झाल्या. त्यानंतर आश्वासनही देण्यात आले.
ठळक मुद्देरमेशचंद्र दहिवडे यांची स्पष्टोक्ती : शासनाने शब्द न पाळल्याने अंगणवाडी महिला कर्मचारी रस्त्यावर