लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : डीसीपीएस (नवीन परिभाषीत अंशदायी निवृत्ती वेतन योजना) पेन्शन योजनेचे हिशेब अद्यावत करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत शिक्षकांच्या समस्या गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षाकांकरिता दुय्यम सेवा पुस्तक नोंदीकरिता शिबिराचे आयोजन करावे, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते, अर्जित रजा प्रकरणे, वैद्यकीय रजा प्रकरणे, स्थायी, नियमित, चटोपाध्याय, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, बदली झालेल्या शिक्षकांची सेवा पुस्तक पाठविणे, मार्च २०१८ चे वेतन देणे, शालेय पोषण आहाराचे बिल, उपस्थित भत्ता देणे आदी बाबत चर्चा झाली. त्याचबरोबर शिक्षक उईके यांचे प्रलंबित देयके मंजूर करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष आशिष धात्रक, सचिव अंकुश मैलारे, जनार्धन म्हशाखेत्री, बापू मुनघाटे, देवेंद्र लांजेवार, दीपक सुरपाम, नितीन कुंभारे, माजीद शेख, शरद जगताप, वासेकर, विद्या सोनुले, चिलमवार, कविता आंबोरकर, पुरूषोत्तम चिमुरकर, मुरमुरवार, चलाख, मंगला शेंडे, पाळवदे, गायकवाड, रायपुरे उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने गट शिक्षणाधिकारी रमेश उचे, वरिष्ठ लिपीक मेश्राम, वनकर, ताराम, साना उपस्थि होते.
डीसीपीएसचे हिशेब अद्ययावत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:35 PM
डीसीपीएस (नवीन परिभाषीत अंशदायी निवृत्ती वेतन योजना) पेन्शन योजनेचे हिशेब अद्यावत करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देडीसीपीएस (नवीन परिभाषीत अंशदायी निवृत्ती वेतन योजना)