शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

उद्योग उभारणीसाठी पैशापेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:44 PM

बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.

ठळक मुद्देगिरीधर गांधी यांचे प्रतिपादन : जिल्हा बिझनेस समिट कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले.गडचिरोली येथील गोंडवन कला दालन येथे रविवारी गडचिरोली जिल्हा बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, चंद्रपूरचे मधुसूधन रूंगटा, गडचिरोली जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक पाटील, उद्योग निती फाऊंडेशन चंद्रपूरचे संस्थापक अविनाश टीपरे, आरसेटीचे समन्वयक काटकर, एव्हीजी गोट फार्मच्या अरूणा म्हरस्कोल्हे, प्रदीप लाड, चंद्रपूरचे नितीन चनकरवार, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक जाटव, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनील कुनघाडकर, चामोर्शी पंचायत समितीचे सभापती आनंद भांडेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार आदी मान्यवर उपस्थित होेते.पुढे मार्गदर्शन करताना गिरीधर गांधी म्हणाले गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी अतीशय चांगले वातावरण व संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या जंगलावर आधारित अनेक उद्योग स्थापन करता येतात. येथील वनौषधी जगप्रसिद्ध आहे. सदर वनौषधी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून गोळा करून ती देशातील नामांकित कंपन्यांना विकता येते. या वनौषधीवर प्राथमिक प्रक्रिया करणारे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. बँकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. सदर पैसा बँकांना कर्जातच गुंतवावा लागतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या शोधात आहेत. नागरिकांचा पैसा बँकेत पडून राहिल्याने बँकांना आपल्या ग्राहकांना व्याज भरून द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा नवीन उद्योजकांनी उचलावा. नवीन व्यवसाय करू इच्छीनाºया व्यक्तीला विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशन मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असल्याचे प्रतिपादन केले.खासदार अशोक नेते यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले केंद्र व राज्यातील सरकारने उद्योगांना चालना देण्याचे धोरण अवलंबीले आहे. त्यामुळे उद्योगामध्ये चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्योगांना चालना देण्यासाठीच शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:चा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होत आहे. असे मार्गदर्शन केले.जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मार्गदर्शन करताना अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम दर महिन्यातून किमान एकदा आयोजित करावे असे मार्गदर्शन केले आहे.उद्योजकांच्या समस्यांचे समाधानया कार्यक्रमादरम्यान उद्योग स्थापन इच्छिणाºया नागरिकांकडून अर्ज भरून मागण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी मार्गदर्शनकर्त्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. १०० दिवसांत १०० उद्योग स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.