लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांकडून विविध रोगांसाठी रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉयोटिक) औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोगप्रतिकारक औषधांचा वापर आवश्यकतेनुसार व योग्य प्रमाणात झाला पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नीरज लोहकरे यांनी केले.गडचिरोली जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने येथील केमिस्ट भवनात सोमवारी आयोजित जागतिक फार्मसिस्ट दिवस सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दोंतुलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून असोसिएशनचे सचिव दीपक वैद्य, माजी अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, कोषाध्यक्ष दिनेश कुंडे, माजी अध्यक्ष चंद्रभान जेनेकर, सहसचिव नितीन बन्सोड, उपाध्यक्ष नवलकिशोर काबरा, मुक्तीपथचे डॉ. मयूर गुप्ता, संतोष सावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतीमा पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे बोलताना निरज लोहकरे म्हणाले, रूग्ण तसेच जनतेनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगांवर औषधोपचार करून घ्यावा, जेणेकरून फसवणूक होणार नाही. औषध वापरामध्ये फार्मसिस्टने पेशन्ट कौन्सलिंगच्या माध्यमातून व्यवस्थित सल्ला द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी सतीश विधाते, नितीन दोंतुलवार यांच्यासह डॉ. मयूर गुप्ता यांनीही आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे सचिव दीपक वैद्य यांनी केले तर आभार देवेंद्र सोमनकर यांनी मानले. कार्यक्रमाला मेडिकल एजन्सी संचालक व औषध विक्रेते उपस्थित होते.शहरातून काढली रॅलीजागतिक फार्मसिस्ट दिवसानिमित्त गडचिरोली असोसिएशनच्या वतीने केमिस्ट भवनापासून चामोर्शी मार्ग ते इंदिरा गांधी चौक ते त्रिमूर्ती चौकातून चंद्रपूर मार्गे या रॅलीचा पुन्हा केमिस्ट भवनात समारोप झाला. या रॅलीमध्ये असोसिएशनच्या पदाधिकाºयांसह शहरातील मेडिकल एजन्सी चालक तसेच औषध विक्रेते उपस्थित होते.
रोगप्रतिकारक औषधांचा वापर आवश्यकतेनुसार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:41 PM
गेल्या अनेक महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांकडून विविध रोगांसाठी रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉयोटिक) औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
ठळक मुद्देजागतिक फार्मसिस्ट दिवस सोहळा उत्साहात : अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांचे प्रतिपादन