डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय, नागपूर व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांच्यामार्फत ॲझाेला तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी कृषी विज्ञान केंद्र, सोजापूर-गडचिरोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन डाॅ. मायी यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयाेगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहायक पाेलीस निरीक्षक महादेव शेलार व शेतकरी महिलांची उपस्थिती होती.
महादेव शेलार यांनी सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने भाजीपाला लागवड करण्याविषयी विशेष मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येकाने आपल्या घरी परसबागेत भाजीपाला लावावा, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स
उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत
ॲझोला ही पिकाला नत्र पुरविणारी वनस्पती आहे. हिरवळीचे खत म्हणून या वनस्पतीचा चांगला उपयोग होऊ शकतो. ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती जमिनीत टाकल्याने लवकर कुजते. त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते, असे प्रतिपादन संदीप कऱ्हाळे यांनी केले.
बाॅक्स
उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ
ॲझाेलाच्या वाढीसाठी पाण्याची गरज असते. त्याचा धान पिकासाठी चांगला उपयोग होतो. शिवाय सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. शेतकऱ्यांच्या धानाच्या उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲझाेलाचा वापर हंगामात पीक वाढीसाठी करावा, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश कडू यांनी केले.
170921\17gad_1_17092021_30.jpg
मार्गदर्शन करताना डाॅ. सी.डी. मायी साेबत डाॅ. प्रकाश कडू,संदीप कऱ्हाळे.