लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैैधरित्या वाहतूक विक्री करण्याकरिता अनेक प्रकारची शक्कल लढविली जाते. अशीच काहीशी अनोखी शक्कल लढवून भाजीपाला वाहतुकीच्या कॅरेटमधून दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.लाखांदूर मार्गावरून अवैैधरित्या दारूची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवली. तेव्हा दुचाकीने एक इसम मागे भाजीपाल्याचे कॅरेट बांधून येतांना दिसून आला. सदर इसमाची दुचाकी थांबवून तपासणी केली असता, कॅरेटमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. देसाईगंज पोलीस निरीक्षक सदानंद मांडवकर, एपीआय गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. देसाईगंज तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने दारूची वाहतूक होत आहे.मोहगाव येथे दारूविक्री बंदीचा ठरावसीमाभागात असल्यामुळे कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होते. आपल्या गावात तरी ती दारू येऊन गावातील शांतता नष्ट होऊ नये, यासाठी मोहगाव (वाकडी) येथील महिला एकत्र आल्या. या महिलांची बैठक घेऊन मुक्तिपथच्या कुरखेडा तालुका चमूने त्यांना गावातील दारू विक्री बंद करण्याविषयी मार्गदर्शन केले. मुक्तिपथच्या कार्यकर्त्यांनी महिलांना गावात दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेणे, तशी नोटीस दारू विक्रेत्यांना देणे व ठरवलेल्या तारखेनंतरही दारू विक्री सुरु राहिल्यास दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे या विषयी माहिती दिली. गावातील दारूबंद करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा व दारूला हद्दपार करावे, असे आवाहन करण्यात आले.स्वातंत्र्यदिनी दारूबंदीचा ठराव घ्यायेत्या स्वातंत्र्य दिनाला गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याचा ठराव पारीत करण्यात यावा व सोबतच काही दिवसात ग्राम सेवक, सरपंच यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, याबाबत पंचायत समितीमध्ये प्रभारी संवर्ग विकास अधिकारी एस. आर. टिचुकले यांच्याशी मुक्तिपथ तालुका संघटक नीळा किन्नाके यांनी चर्चा केली. टिचुकले यांनीही तालुका स्तरावर चांगले नियोजन करू व अवैध दारू विक्री बंद करण्याकरीता प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. यावेळी बीईओ आत्राम, फाये, भालचंद्र मडावी उपस्थित होते.
दारू वाहतुकीसाठी कॅरेटचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 10:37 PM
गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैैधरित्या वाहतूक विक्री करण्याकरिता अनेक प्रकारची शक्कल लढविली जाते. अशीच काहीशी अनोखी शक्कल लढवून भाजीपाला वाहतुकीच्या कॅरेटमधून दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले.
ठळक मुद्देदारूविक्रेत्यांची अनोखी शक्कल : देसाईगंज पोलिसांनी लाखांदूर मार्गावर केली अटक