विष्णू दुनेदारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर करण्याचा प्रयोग राबविला आहे.आत्माअंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रिय शेतकरी गट स्थापन करण्यात आला आहे. या गटात २० शेतकरी आहेत. ते सर्वजण धानाची शेती करतात.बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. किटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरिया, जपान, थायलंड या देशांमध्ये मोठ्या प्रमानात 'राईस डक फार्मिंग करतांना बदकांचा वापर केला जातो. हाच धागा पकडून नैनपुरातील शेतकऱ्यांनी या प्रयोग सुरू केला आहे.यासाठी गटाने २० बदके खरेदी केली आहेत. त्यांचे व्यवस्थापन व पोषणाची जबाबदारी गटाने घेतली आहे. गटातील शेतकऱ्यांच्या शेतात ही बदके सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत आळीपाळीने सोडली जातात. धानाच्या शेतातील तण, खोडकिडे, तुडतुडे व अन्य किटक ही बदके पाहता पाहता फस्त करीत जातात. शिवाय त्यांच्या पायांमुळे शेतजमीन भुसभुशीत होऊन तिची सुपीकता वाढण्यास मदतच होते. याखेरीज बदकाची अंडीही मिळत असून त्याची विक्री करण्यात येते आहे. शेतकऱ्यांनी हा केलेला प्रयोग परिसरात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरतो आहे.सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी, कीड व तण निर्मुलन,बदकांपासून आर्थिक उत्पादन मिळते तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर हितकारक आहे.डॉ.प्रकाश पवारप्रकल्प संचालक आत्मागडचिरोली.---------------------------------बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर कीड खाण्यासाठी व अंड्यांसाठी होतो. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकऱ्यांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल .डॉ.पी.जी.सुकारेपशुधन विकास अधिकारीबदक पैदास प्रक्षेत्र वडसा
गडचिरोली जिल्ह्यात तण व कीड नियंत्रणासाठी होतोय बदकांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 2:29 PM
देसाईगंज तालुक्यातील नैनपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर करण्याचा प्रयोग राबविला आहे.
ठळक मुद्देनैनपूर येथील शेतकऱ्यांचा धान शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग