लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील सावलखेडा ग्राम पंचायतींतर्गत असलेल्या भगवानपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट साठवण बंधाऱ्याचे काम सुरू आहे. मात्र या कामात मजुरांऐवजी जेसीबी यंत्राचा वापर होत असल्याने स्थानिक मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे.स्थानिक मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावून योजनेच्या कामात यंत्राचा वापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगवानपूर येथील नागरिकांनी केली आहे.सावलखेडा गट ग्राम पंचायतींतर्गत भगवानपूर येथील पांडुरंग दुमाने यांच्या शेताजवळ जि. प. सिंचन उपविभाग कुरखेडाच्या वतीने सिमेंट काँक्रिट साठवण बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र अकूशल माती खोदकाम मजुरांऐवजी जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येत आहे. सन २०१७-१८ वर्षातील या बंधाऱ्याच्या बांधकामाला १२ एप्रिल २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दीड महिने काम झाले नाही. पावसाळा जवळ आल्याचे कारण पुढे करीत संबंधित अधिकाऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने अकूशल काम हाती घेतले. प्रति दिवस २०३ रूपये प्रमाणे २ हजार ७४१ मनुष्य दिवस इतके मजुरांना काम मिळाले असते. मजुरीची रक्कम खरीप हंगामातील साहित्य खरेदीसाठी शेतमजुरांना उपयोगी आली असती. मात्र वनाधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे रोहयो मजूर कामापासून वंचित राहिले आहेत. परिणामी या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे.मजुरांकडून काम करून घेण्याची मागणीनोंदणीकृत मजुरांना १०० दिवसांचा रोजगार देण्याची हमी रोजगार हमी योजनेच्या कायद्यात नमूद आहे. रोजगार निर्मितीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे मंजूर केली जातात. मात्र भगवानपूर येथे २४ लाख ७३ हजार रूपये किमतीच्या साठवण बंधारा खोदकामात मजुरांना बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे गावातील स्थानिक नोंदणीकृत मजूर नाराज झाले आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिक मजुरांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून सदर सिमेंट काँक्रिट साठवण बंधाºयाचे काम स्थानिक मजुरांकडून करवून घ्यावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे. याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
रोहयो कामात जेसीबीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:26 PM
आरमोरी तालुक्याच्या जोगीसाखरा परिसरातील सावलखेडा ग्राम पंचायतींतर्गत असलेल्या भगवानपूर येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिट साठवण बंधाºयाचे काम सुरू आहे. मात्र या कामात मजुरांऐवजी जेसीबी यंत्राचा वापर होत असल्याने स्थानिक मजुरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. स्थानिक मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावून योजनेच्या कामात यंत्राचा वापर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगवानपूर येथील नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देमजुरांचा रोजगार हिरावला : भगवानपूर येथे सुरू आहे साठवण बंधाऱ्याचे काम