लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे डॉ.व्ही.एम.भाले यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोली येथे बुधवारी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर, सहायोगी संशोधन संचालक डॉ.पी.व्ही.शेंडे, विशेष अधिकारी डॉ.एस.आर.पोटदुखे, सीईओ डॉ.एन.एम.काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.संगीता निरगुळकर, सहयोगी प्रा.डॉ.शालिनी बडगे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरडकर, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव, कृषी विकास अधिकारी दिशांत कोकण आदी उपस्थित होते.पुढे मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.भाले म्हणाले, रबी हंगामात चारा पिकाची लागवड करण्यासाठी पीकेव्ही क्रांती रबी ज्वारीच्या वाणाचा वापर करावा, या पिकामुळे नागरिकांना ज्वारीचे उत्पादन घेता येईल, तसेच जनावरांना चारा उपलब्ध होऊन दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल. जिल्ह्यात रेशीम उद्योग वाढविण्यासाठी जिल्हा रेशीम अधिकारी यांच्याशी चर्चा करून रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी सूचना दिल्या. जिल्ह्यातील आंबा व जांभूळ या फळ पिकांच्या स्थानिक वाणांचा मातृवृक्ष तयार करून आंबा व जांभूळ पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन केले. शास्त्रीय सल्लागार समितीच्या ११ व्या सभेचा सन २०१७-१८ चा प्रगती अहवाल प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांचा अहवाल, अनुनियोजित चाचणी अहवाल तसेच बिजोत्पादन कार्यक्रम अहवाल, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी चित्रफितीद्वारे सादर केला.संचालन ज्योती परसुटकर तर आभार ज्ञानेश्वर ताथोड यांनी मानले. यावेळी पुष्पक बोथीकर, डॉ.विक्रम कदम, सुनीता थोटे, दीपक चव्हाण, हितेश राठोड, जी.पी.मानकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रमोद भांडेकर, बाबुराव भोयर, जितेंद्र कस्तुरे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.गोधन वाढवाजिल्ह्यात दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी वाव आहे. शेतीमुळे हिरवा चारा आपोआप उपलब्ध होतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करावे, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ.मानकर यांनी केले.
धानासाठी नवीन तंत्रज्ञान वापरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:08 AM
धानाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी धान लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन करावे, ....
ठळक मुद्देकृषी विद्यापीठ कुलगुरूंचे प्रतिपादन : कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रीय सल्लागार समितीची सभा