शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

निर्माल्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर

By admin | Published: September 11, 2016 1:35 AM

गणेश उत्सवात पूजापाठ करताना फुले, बेलपत्र व अन्य साहित्य तसेच पदार्थांचा वापर केला जातो.

अंनिसकडून संकलन : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकारगडचिरोली : गणेश उत्सवात पूजापाठ करताना फुले, बेलपत्र व अन्य साहित्य तसेच पदार्थांचा वापर केला जातो. त्यानंतर साहित्य तसेच इतरत्र फेकून दिले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. ही बाब टाळण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींमार्फत निर्माल्य संकलन केले जात आहे. निर्माल्य परसबागेत झाडांजवळ टाकून सेंद्रिय खत म्हणून त्याचा वापर केला जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने येथील प्रा. देवानंद कामडी तसेच अनेक नागरिकांच्या घरी भेट देऊन निर्माल्य गोळा करण्यात आले. त्यानंतर निर्माल्य हरित सेनेच्या सुपूर्द करण्यात आले. निर्माल्य परसबागेतील वृक्षांना सेंद्रिय खताच्या रूपाने अर्पण केले जात असून गणेश विसर्जन पर्यावरणपूरक करण्याा अंनिसचा हेतू आहे. निर्माल्य संकलनाच्या वेळी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, उपाध्यक्ष सिंधू चहांदे, शहर कार्याध्यक्ष राजेश चुऱ्हे, प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, प्रा. देवानंद कामडी, सूचिता कामडी व हरित सेनेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच पुरूषोत्तम ठाकरे, दादाजी मेश्राम यांनी हरित सेनेच्या विद्यार्थिनींना गणपती मूर्तीजवळील निर्माल्य सुपूर्द केला. त्यानंतर निर्माल्य परसबागेतील फुलझाडांजवळ टाकून सेंद्रिय खताच्या रूपाने अर्पण करण्यात आला. यावेळी विलास निंबोरकर, पुरूषोत्तम ठाकरे, राजेश चुऱ्हे, दादाजी मेश्राम, अनिता ठाकरे, सुषमा मेश्राम व हरित सेनेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अंनिसच्या या उपक्रमाबद्दल ज्येष्ठ सल्लागार डॉ. शिवनाथ कुंभारे, डॉ. मुरलीधर बद्दलवार, पंडित पुडके, उद्धव डांगे, पुरूषोत्तम चौधरी, संध्या येलेकर, सुनीता उरकुडे, स्मिता लडके, गजानन राऊत यांनी कौतुक केले आहे.