काहींना लेन्स सूट होतात, तर काहींना सूट होत नाहीत. अशा वेळी डोळ्याला खाज येणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे, अशा समस्या उद्भवतात. असे हाेत असल्याच वेळीच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे; अन्यथा डाेळ्यांचे आजार किंवा डाेळ्याला इजा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
चष्म्याला करा बाय बाय
ज्या व्यक्तीला चष्मा लावावा असे वाटत नाही. अशा व्यक्तींसाठी काॅन्टॅक्ट लेन्स वरदान ठरले आहे. चष्म्याऐवजी बरेच युवक, युवती आता काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. मायनस ०.५ ते ९ नंबर असलेले व्यक्तीही काॅन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात.
बाॅक्स
...ही घ्या काळजी
१) काॅन्टॅक्ट लेन्स बसविलेल्या व्यक्तीने डाेळ्यांची फार काळजी घ्यावी. डाेळे चाेळू नयेत, डाेळ्यात काजळ घालू नये.
२) घराबाहेर पडताना जाेराचा वारा, धुळीपासून संरक्षण करण्यासाठी शून्य नंबरचा चष्मा वापरावा. धुळीचे कण व वारा यामुळे लेन्सला धाेका हाेऊ शकताे.
काेट
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय काेणताही काॅन्टॅक्ट लेन्स लावू नये. काॅन्टॅक्ट लेन्स लावतेवेळी हात सॅनिटाइझ करून घ्यावेत. डाेळ्यांना पाणी येत असले, तर लेन्स लावू नये. खुर्चीवर बसून लेन्स व्यवस्थित लावावेत; अन्यथा पडून जाण्याची शक्यता राहते, तसेच घाईघाईत लेन्स लावल्यास इजाही हाेऊ शकते. लेन्स लावून झाेपू नये.
-डाॅ. अद्वय अप्पलवार, नेत्रराेगतज्ज्ञ, गडचिराेली