जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : एटापल्लीतील पदाधिकाऱ्यांचे निवेदनएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होत असल्याने येथील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एटापल्ली येथे दुर्गम भागातील शेकडो नागरिक उपचारासाठी येतात. मात्र येथील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. सध्या केवळ एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने ती त्वरित भरावी, अशी मागणी पं. स. उपसभापती संजय चरडुके, महेश पुल्लुवार, संदीप सेलवटकर, सचिन मोतकुरवार, नरेश गाईन, विनोद चव्हाण, रवी रामगुंडेवार, शेखर फुलमाळी, अनिल बुग्गावार, केशव कोंडलेवार, बाबूराव गंपावार, जीवन वैरागडे यांनी केली आहे.
ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरा
By admin | Published: September 17, 2015 1:44 AM