शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रिक्त पदाने प्रशासकीय यंत्रणेचा डोलारा कोसळला

By admin | Published: October 02, 2016 2:10 AM

महत्त्वाचे असलेलेयेथील उपविभागीय अधिकारी पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. याशिवाय महसूल,

शासनाचे दुर्लक्ष : एटापल्ली तालुक्याचा विकास रखडला, नागरिकांच्या कामासाठी येरझारारवी रामगुंडेवार   एटापल्लीमहत्त्वाचे असलेलेयेथील उपविभागीय अधिकारी पद मागील दोन वर्षांपासून रिक्त आहे. याशिवाय महसूल, आरोग्य, महावितरण, कृषी, पंचायत समिती शिक्षण यासह विविध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. परिणामी एटापल्ली तालुक्याच्या प्रशासकीय यंत्रणेचा डोलारा पूर्णत: कोसळला आहे. दैनंदिन कामे होत नसल्याने नागरिक तालुका मुख्यालयाच्या कार्यालयात वारंवार येरझारा मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे.येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांची दोन पदे रिक्त आहेत. गोदाम किपर व शिपायाचे प्रतयेकी एक पद रिक्त आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची सात व आरोग्य सेवक (स्त्री, पुरूष) तीन असे एकूण १० पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविकांची १५, परिचर ५ व समाई कामगाराचे एक असे एकूण ३८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील आरोग्यसेवक पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. बांधकाम विभागाच्या कार्यालयात शाखा अभियंत्याचे तीन, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक तीन, कनिष्ठ लिपीक दोन, वाहनचालक एक, शिपाई एक, चौकीदार दोन, केअरटेकर तीन, खानसामा एक अशी एकूण १६ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या येथील कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याचे एक, वरिष्ठ टेक्निकल दोन, फोनमॅन एक, टेक्निशयन तीन, ज्युनिअर टेक्निशयन दोन, युडीसी एक, अकाऊंट असिस्टन्ट एक अशी एकूण १० पदे रिक्त आहेत. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी, मुख्य सहायक, लेखापाल, दुरूस्ती लिपीक, नगर भूमापन लिपीक, प्रतीलीक, शिपाई अशी एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना वनहक्क पट्टे देण्याच्या कार्यवाहीत प्रचंड विलंब होत आहे. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक एक, वैद्यकीय अधिकारी दोन, अधिपरिचारीका सात, क्ष-किरण तज्ज्ञ एक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपीक, कक्ष सेवक अशी एकूण ११ पदे रिक्त आहे.पंचायत समितीत अनेक पदे रिक्तपंचायत समितीच्या पशुवसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकारी सहा, पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक एक, परिचर सहा अशी एकूण १४ पदे रिक्त आहेत. कृषी विभागात कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, हातपंप यांत्रिकी, आरोग्य सेवक, वाहनचालक, परिचर प्रत्येकी एक असे एकूण सहा पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागांतर्गत तालुक्यातील शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची तीन, पदवीधर शिक्षकांची ३७, सहायक शिक्षकांची ११ असे एकूण ५१ पदे रिक्त आहेत. आयटीआयमध्ये २६ पदे रिक्त आहेत.