लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पशुंना पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी १ लाख १३ हजार ४५० जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे.गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. पावसाळ्यात जनावरांना विशेष करून घटसर्प, एकटांग्या, चौखुरा, आंत्रपिशार, शेळ्यांची पीपीआर, शेळ्या, मेंढ्यांवर येणारा देवी रोग आदी संसर्गजन्य रोगांचा प्रसार होते. यामुळे कित्येक जनावरे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता राहते. या सर्व रोगांपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पावसाळा लागताच लसीकरण होणे आवश्यक आहे. पशुपालक पैसे खर्च करून लसीकरण करू शकत नाही. त्यामुळे शासनाच्या मार्फत पशुसंवर्धन विभागाला औषध व लस पुरवठा केला जातो. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी गावात जाऊन जनावरांना लस देतात. यावर्षी सुमारे १ लाख १३ हजार ३५० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये घटसर्पची लस २३ हजार ८९२ जनावरांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर २७ हजार ५३३ जनावरांना एकटांग्या, ५५ हजार १०५ जनावरांना चौखुरा, १६ हजार ६३३ जनावरांना आंत्रपिशार, २ हजार २०० शेळ्यांना पीपीआर व १ हजार ९०० शेळ्यांना देवी रोगाची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.२२१ पैकी ७६ पदे रिक्तजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकाऱ्यांची १०८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४५ पदे भरण्यात आली आहेत तर ६३ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाºयांची संपूर्ण २२ पदे भरण्यात आली आहेत. पशुधन पर्यवेक्षकाची ९१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७८ पदे भरली असून १३ पदे रिक्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. एका पशुधन विकास अधिकाºयाला १२ ते १३ गावांचा प्रभार सांभाळावा लागत आहे. त्यातही गावांचे अंतर अधिक आहे.
१ लाख १३ हजार जनावरांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:16 AM
पशुंना पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होऊ नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी १ लाख १३ हजार ४५० जनावरांना प्रतिबंधात्मक लस दिली आहे.
ठळक मुद्देसाथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय : पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार