जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी गावपातळीवर आरोग्य यंत्रणा कार्यरत असून नागरिकांच्या लसीकरणास प्रोत्साहित करीत आहे. आतापर्यंत कोविशिल्ड या लसीचे ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पहिले लसीकरण ३ हजार ७८३ नागरिकांना व दुसरी लस २ हजार १८५ नागरिकांनी अशा एकूण ५ हजार ९८६ नागरिकांनी लसीकरण केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथे कोविशिल्डचा पहिला डोस २ हजार ६२१ तर दुसरा डोस ३१६ असे एकूण २ हजार ९३७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील एकूण १ हजार ४६ लोकांनी लस घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूड अंतर्गत कोविशिल्डचा पहिला डोस १ हजार ७४० तर दुसरा डोस ३११ अशा एकूण २ हजार ५१ लोकांनी लस घेतली.
दरम्यान कोव्हॅक्सिन या लसीचा प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी येथे पहिला डोस २ हजार ६१८ नागरिकांनी तर दुसरा डोस ६ अशा एकूण २ हजार ६२४ नागरिकांनी घेतला. तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात पहिला डोस ६३४ नागरिकांनी घेतला.
देसाईगंज तालुक्यात दोन्ही लस मिळून आतापर्यंत पहिला डोस ११ हजार ३९६ तर दुसरा डोस २ हजार ८१८ अशा एकूण १४ हजार २१४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आपल्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. अभिषेक कुंभरे यांनी केले आहे.