बाॅक्स
ऑन द स्पाॅट किंवा ॲपवर करता येणार नाेंदणी
काेराेनाची लस घेण्यासाठी संबंधित व्यक्तीची नाेंदणी हाेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र ॲप तयार केले आहे. तसेच ज्या रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र केंद्र तयार केले जाणार आहे. त्या ठिकाणीसुद्धा नाेंदणी करता येणार आहे.
नाेंदणी करतेवेळी वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, जन्मदाखला आदी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत.
व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याबाबतचे डाॅक्टरांचे नुकतेच काढलेले प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. २० प्रकाराच्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. ते काेणते आजार आहेत, याची माहिती आराेग्य विभागाकडे उपलब्ध हाेणार आहे.
मंगळवारपासून लसीकरणाला येणार गती
केंद्र शासनाने १ मार्चपासून म्हणजेच साेमवारपासून लस उपलब्ध हाेईल, असे जाहीर केले आहे. मात्र, याबाबतचे नियाेजन करण्यास उशीर लागू शकतो. त्यामुळे साेमवारी दुपारनंतर लस उपलब्ध हाेऊ शकेल. मंगळवारपासून लसीकरणाला गती येईल, अशी माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.
येथे मिळणार काेराेना लस
१ गडचिराेली येथील सिटी हाॅस्पिटल
२ गडचिराेली येथील धन्वंतरी हाॅस्पिटल
३ जिल्हा रुग्णालय
४ उपजिल्हा रुग्णालये
५ ग्रामीण रुग्णालये