सिराेंचा : तालुक्यातील वडदम ते चिटूर या सहा कि.मी. मार्गाचे चार महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आले; परंतु अल्पावधीतच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वडदम ते चिटूर हा मार्ग अतिदुर्गम गावांना जोडणारा आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. येथील कच्चा रस्ता गिट्टी उखडल्याने दुरवस्थेत होता. रस्त्याचे बांधकाम यंग कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात आले. यासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने सदर मार्गाची अल्पावधीतच दुरवस्था झाली. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वडदम व चिटूर येथील नागरिकांनी केली आहे. या भागात विकासाच्या नावाने बाेंब आहे. प्रशासनाचे नियाेजन ढासळल्यामुळे विकासात गती नसल्याचे दिसून येत आहे.
वडदम-चिटूर मार्ग उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:35 AM