महाराष्ट्र राज्यातून सामाजिक वनीकरण विभागाच्या चामोर्शी तालुक्यातील वृक्ष लागवड केंद्रास प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी बनिक यांनी आपले आयुष्य वेचले. कुटुंबासहित वृक्ष लागवड केंद्राजवळ झोपडी बांधून अहोरात्र मेहनत करून आजपर्यंत लाखो वृक्षांची लागवड केली. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने समस्त वृक्षाची संगोपनही केले.
वृक्ष लागवड करताना, आजपर्यंत प्राचीन आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार स्वखर्चाने केला. सोबतच सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी मधुमेह, उच्च रक्तदाब, कावीळ, जुना ताप, खोकला, त्वचा रोग, किडनी स्टोन, दमा, तथा अनेक दुर्धर आजारांवर मोफत आयुर्वेदिक वनस्पती औषधी उपलब्ध करून दिली. आजही दररोज सकाळी अनेक रुग्ण बनिक यांच्या घरी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जिल्हा व बाहेर जिल्ह्यातून येथे येत असतात. हजारो रुग्णांना मोफत आयुर्वेदिक वनस्पती देऊन एकही रुपया न घेता विविध रोगांपासून मुक्ती दिली. माणिक बनिक यांना कोणतीही माहिती न देता, शाल व श्रीफळ घेऊन आमदार डॉ.देवराव होळी व पदाधिकारी बनिक यांच्या घरी पोहोचले होते, यावेळी बनिक यांच्या कुटुंबीयांना खूप खूप आनंद झाला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.