शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

वैद्यराजांनी जाणली वनौषधींची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 5:00 AM

प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले. दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माडिया व आदिम प्रवर्गाच्या वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन स्थानिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील टीपागड सभागृहात करण्यात आले होते. दरम्यान, वैद्यराजनी विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणली.प्रशिक्षण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे अधीक्षक रवींद्र राऊत, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहायक प्राध्यापक डॉ. घनश्याम कोडवानी, दत्तात्रय काटकर, डॉ. मनीष भोयर, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) अनिल सोमनकर, प्रभू सादमवार, प्रमोद वरगंटीवार, सुधाकर गौरकार आदी उपस्थित हाेते.प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. वनौषधी ओळख व उपचार याबद्दल नंदाजी चलाख यांनी मार्गदर्शन केले. दुर्धर रोगांवर आयुर्वेदिक उपचाराबाबत कालीपद मलिक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन नेताजी अन्नपत्रवार यांनी तर आभार सहा. वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले.या जिल्ह्यातील वैद्यराज,वनौषधी लागवड लाभार्थ्यांची उपस्थिती होती तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शिंदे,वनपाल के,एम फाये, वनरक्षक शीतल कुळसंगे आदींनी सहकार्य केले.

गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाला भेट-    उपस्थित मान्यवर व वैद्यराजनी गोंडवाना हर्ब्स येथे भेट दिली. दरम्यान, हनुमंत नरोटे यांनी गोंडवाना हर्ब्स प्रकल्पाविषयी माहिती दिली. प्रकाश उरकुडे यांनी वनौषधी तयार करून रोगांवर उपचाराबाबत मार्गदर्शन केले तसेच मध्यवर्ती रोपवाटिकेला भेट देऊन विविध वनौषधी व गुणकारी रोपांची माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :forest departmentवनविभागmedicinesऔषधं