शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

त्रिवेणी संगमस्थळावर होणार विविध सोयी

By admin | Published: June 19, 2014 12:06 AM

नैसर्गिक सौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत भामरागडचा पर्यटनाच्या

रमेश मारगोनवार - भामरागडनैसर्गिक सौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या भामरागड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत भामरागडचा पर्यटनाच्या दृष्टीने मोठा विकास होऊ घातला आहे. या कामांना प्रारंभ झाला असून भामरागडचे चित्र पालटेल, अशी आशा स्थानिकांना आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड तालुका गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम व अतिदुर्गम तालुका आहे. छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या या तालुक्यात अनेक गावांमध्ये अजूनही मुलभूत व पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. अनेक गावात वीज, पाणी, रस्ता पोहोचलेला नाही. मात्र वनविभागाने भामरागडची नैसर्गिक साधन संपत्ती लक्षात घेऊन या भागात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विकास कामे सुरू केले आहे.भामरागड येथे पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमस्थळाजवळ वनविभागाने नदीच्या किनाऱ्याला लागून घाट स्वरूपाच्या पायऱ्यांचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच संगमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक विश्रामगृहाची इमारतही उभारलेली आहे. संगमस्थळावर आणखी विश्रामगृहाच्या स्वरूपात शेड उभे केले जाणार आहे. संगमस्थळाजवळ आणखी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भामरागड गावातून वनविभागाच्या विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी लहान पुलही बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येथील १९६४ मध्ये निर्माण झालेल्या वनविभागाच्या विश्रामगृहाला पूर्णत: उकलण्यात आले असून त्याच स्वरूपाचे नवीन विश्रामगृह उभे केले जाणार आहे. यात जुन्यासारखेच दोन कक्ष राहणार आहे. याशिवाय सर्वसामान्य पर्यटक, नागरिक यांच्यासाठी १० ते १२ नवे सुट बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक मोठे सभागृहसुद्धा बांधले जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय जिल्ह्याच्या वनसंपदेची माहिती देणारे प्रदर्शनही या ठिकाणी उभारले जाणार आहे.