लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला कडाडल्याने ग्राहकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला.जिल्हा मुख्यालयातील बाजारपेठेत दर रविवारी तालुक्यासह चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, धानोरा यासह अन्य तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होते. तरीसुद्धा रविवारी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. सध्या लग्न समारंभाची धामधूम आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असली तरी मागणी अधिक असल्याने बाजारपेठेत वस्तू टिकून राहत नाही. त्यामुळे रविवारच्या बाजारात विविध वस्तूंचे दर वाढल्याचे दिसून आले. अनेक ग्राहकांनी किलो ऐवजी अर्धा किलो वस्तूवरच समाधान मानले.अशी झाली वस्तूंची भाववाढआठवडाभरापूर्वी पालेभाज्या व फळभाज्यांचे दर स्थिर होते. परंतु २१ एप्रिलच्या गडचिरोली आठवडी बाजारात विविध वस्तूंची दरवाढ झाल्याचे दिसून आले. उत्तम दर्जाचे टमाटर ४० रूपये प्रति किलो, बटाटे २० रूपये प्रति किलो, मिरची १५ ते २० रूपये पाव, कांदे २० रूपये प्रति किलो, कोथिंबीर ३० ते ४० रूपये पाव, कारले १० ते १५ रूपये पाव, भेंडी २० रूपये प्रति किलो, लवकी २० रूपये प्रति नग, फुल कोबी १० रूपये पाव, फणस १० रूपये पाव, लसून २० रूपये पाव याप्रमाणे विकले जात होते. याशिवाय बाजारात आंब्याची अत्यल्प आवक असल्याने ८० ते १०० रूपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. या भाववाढीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसला. सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने तसेच जिल्ह्यात वादळी पाऊस होत असल्याने भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम होत आहे. याचेच कारण म्हणून प्रचंड भाववाढ झाली. त्यामुळे खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला.
भाजीपाल्याचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:18 AM
सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला कडाडल्याने ग्राहकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला.
ठळक मुद्देग्राहकांना आर्थिक फटका : समारंभासाठी मागणी वाढल्याचा परिणाम