लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.वाहन चालान झाल्यास संबंधित वाहन चालकाला वाहतूक पोलिसामार्फत कागदी चालान पावती दिली जात होती. या पावतीची नोंद सायंकाळी वाहतूक शाखेतील बुकावर केली जात होती.पावती बुकाऐवजी आता वाहतूक पोलिसाकडे ई-चालान मशीन दिसून येणार आहे. या मशीनसोबतच एक छोट्या आकाराचा प्रिंटर आहे. प्रिंटर व ई-चालान मशीन एकमेकांसोबत ब्लुटूथने जोडण्यात आल्या आहेत. मशीनमध्ये एन्ट्री झाल्यानंतर प्रिंटरमधून पावती निघेल. सदर पावती वाहन चालकाला दिली जाईल. दंडाची रक्कम एटीएम कार्ड स्वाईप करून भरण्याची सुविधा या मशीनमध्ये उपलब्ध आहे.मशीनचे उद्घाटन करतेवेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी समिर साळवे, ठाणेदार प्रदीप चौगावकर, वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी लक्ष्मीछाया तांबूसकर, पोलीस हवालदार वसंत येंदडवार, मपोना नंदना कोडाप, मपोशि शेवंती सुल्वावार, वनिता धुर्वे, रविता मडावी आदी उपस्थित होते.अशी काम करते मशीनप्रत्येक वाहतूक पोलीस शिपायासाठी स्वतंत्र मशीन राहणार आहे. वाहतूक पोलीस शिपायाचा लॉगिन आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर मशीन सुरू होईल. मशीनमध्ये सर्वप्रथम जे वाहन चालान करायचे आहे, त्या वाहनाचा चालकासह फोटो काढला जाणार आहे. त्यानंतर वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, वाहन चालक परवाना, वाहनावरचा दंड आदी माहिती भरली जाईल. या माहितीवरून दंडाची पावती जवळच असलेल्या प्रिंटरमधून निघेल. सदर मशीनचे सॉफ्टवेअर एडीजी ट्रॉफिक मुंबई यांच्यासोबत कनेक्ट राहणार आहे. त्यामुळे एकदा चालान फाडल्यानंतर ती रद्द करणे, अतिशय अवघड बाब राहणार आहे. ही मशीन लोकेशन दाखविते. वाहतूक पोलीस नेमका कुठे आहे, याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळणार आहे.दंडाची रक्कम भरण्यासाठी एटीएम कार्ड स्वाईप करण्याची सुविधा सुध्दा या मशीनमध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी एखाद्या वाहनावर दंड आकारला असेल व त्याने दंडाची रक्कम भरली नसेल तर जुनी दंडाची रक्कम सुध्दा या मशीनमध्ये दाखवेल. विशेष म्हणजे, सदर मशीन आॅनलाईन पध्दतीने काम करीत असल्याने दुसºया जिल्ह्यातीलही संबंधित वाहनावरील दंडाची रक्कम दर्शविते.या मशीनमुळे वाहतूक पोलीस शाखा पारदर्शक व गतिमान होण्यास मदत होणार आहे.
वाहनांचे आता ई-चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:44 PM
गडचिरोली शहर वाहतूक शाखेला वाहने चालान करण्याच्या १० मशीन प्राप्त झाल्या. या मशीनचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. या मशीनमुळे वाहतूक शाखेचा कारभार गतिमान व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
ठळक मुद्देगडचिरोलीत शुभारंभ : शहर वाहतूक शाखा झाली हायटेक