लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. त्याचबरोबर जात पडताळणीविषयी चर्चा केली.अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार हरिश पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गडचिरोली जिल्ह्याच्या दौºयावर आली आहे. या समितीचे सदस्य आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आ. धनाजी अहीर, आ. प्रकाश गजभिये, आ. लखन मलिक, आ. राजू तोडसाम, आ. ज्ञानराज चौघुले, आमदार रहाटे हे सुध्दा दौºयावर आहेत. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीने आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी अशोक चौधरी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.या समितीने विभाग प्रमुखांची चर्चा करून अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. कामाला गती देण्याचे निर्देश दिले. सदर समिती तीन दिवस जिल्हा दौरावर असून शुक्रवारी जिल्ह्यातील मागासवर्ग उपयोजना क्षेत्रांतर्गत चालविल्या जाणाºया शासकीय, अनुदानित शाळा व वसतिगृहांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच जिल्हा परिषद यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कामांना भेटी देऊन चर्चा करणार आहेत. शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा सर्व विभागांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
जात पडताळणीचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:52 PM
महाराष्टÑ विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : शुक्रवारी करणार वसतिगृहांची पाहणी