लाेकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील गाेविंदगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एकही कर्मचारी दवाखान्यात नियमित उपस्थित राहत नाही. एवढेच नाही तर २६ जानेवारी राेजी ध्वजाराेहणसुद्धा करण्यात आले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. गाेविंदगावच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर ही पदे भरली आहेत. मात्र, हे कर्मचारी व डाॅक्टर दवाखान्यात नियमित येत नाहीत. ते कधी येतात व जातात हे गावकऱ्यांनासुद्धा माहीत नाही. दरवर्षी या दवाखान्यात १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ध्वजाराेहण हाेत हाेते. यावर्षी मात्र ध्वजाराेहणसुद्धा झाले नाही. लाखाे रुपये खर्चून पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत तयार करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी वसाहतसुद्धा आहे. परंतु एकही कर्मचारी मुक्कामी राहत नाही. सभाेवताल कचरा पसरला आहे. या दवाखान्याचा उपयाेग नाही. पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.