लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची एकूण १६ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ चार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली असून उर्वरित १२ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील जवळपास दोन लाख पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. रिक्त पदांमुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णत: खिळखिळी झाली आहे.लोकसंख्या व विस्ताराच्या बाबतीत मोठा आहे. तालुक्यात शेतकरी व पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शासनाने २०१२ मध्ये १९ वी पशुगणना केली. त्यामध्ये चामोर्शी तालुक्यात एकूण १ लाख ९९ हजार ३८४ इतकी पशुधनाची संख्या नोंदविण्यात आली आहे. यामध्ये ६७ हजार ७२१ गाय वर्ग, ७ हजार ६९५ म्हैस वर्ग, २३ हजार ३२३ शेळ्या, ३५५ मेंढ्या, ९४ हजार ८२५ कुकुट पक्षी व इतर पशुधनाची संख्या २ हजार २५७ आहे. अशा प्रकारे तालुक्यात एकूण १ लाख ९९ हजार ३२४ इतके पशुधन आहे. जिल्हा परिषद स्तरांतर्गत ५८५ पैदास संकरीत गायी, ११ हजार ५९३ देशी गावठी गायी, ४ हजार ४२३ म्हैस आहेत. चामोर्शी तालुक्यात जनावरांची काळजी घेण्यासाठी जि.प. अंतर्गत श्रेणी १ चे १४, श्रेणी २ चे पाच व आष्टी येथे फिरते पशु चिकित्सालय तसेच चामोर्शी येथे राज्यस्तरीय लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अशा एकूण २१ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकाºयांची १६, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ३, पशुवधन पर्यवेक्षकांची १२, पशु पट्टीबंधकांची ६ व परिचराची २३ पदे शासनाकडून मंजूर आहेत. मात्र पशुधन विकास अधिकाºयांची तब्बल १२ पदे रिक्त असून पशुधन पर्यवेक्षकाचे व परिचराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे.वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी सुस्तचामोर्शी तालुक्यातील अर्थव्यवस्था शेती व पशुपालन व्यवसायावर अवलंबून आहे. या तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी असूनही पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे गेल्या अनेक वर्षापासून भरण्यात आली नाही. यामुळे आजारी जनावरांवर लागलीच औषधोपचार करण्यासाठी पशुपालकांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात अनेक शेतकरी व पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीकडे समस्या मांडली. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी कमालीचे सुस्त दिसत आहेत.
पशुवैद्यकीय सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 11:48 PM
स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची एकूण १६ पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी केवळ चार अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली असून उर्वरित १२ पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने तालुक्यातील जवळपास दोन लाख पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठळक मुद्देदोन लाख पशुधन संकटात : पशुसंवर्धन विभागात विकास अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त