लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रात आमची सरकार आली की आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देतो, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमी भाव देऊ, कृषी पंपाचे वीज बिल माफ करू, असे अनेक आश्वासने भाजपच्या पदाधिकाºयांनी निवडणुकीपूर्वी दिली. मात्र सत्ता आल्यानंतर या पदाधिकाºयांना या साºया आश्वासनांचा विसर पडला आहे. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून ३० नोव्हेंबरला खासदार अशोक नेते यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी बुधवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी नेवले म्हणाले, विदर्भ राज्य हमखास देऊ, असे भाजपच्या पदाधिकाºयांनी सांगितले होते. मात्र आता विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत ते एकही शब्द बोलायला तयार नाहीत. उलट भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आता जनता खोट्या आश्वासनाला वैदर्भिय जनता बळी पडणार नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता आम्ही आरपारची लढाई शासनाच्या विरोधात करणार आहोत, असेही राम नेवले यावेळी म्हणाले. याचीच पूर्वतयारी म्हणून ११ नोव्हेंबर रोजी गडचिरोलीत शेतकरी युवक व महिलांचा मेळावा घेण्यात येणार आहे. तसेच ११ डिसेंबरला संपूर्ण विदर्भात हडताळ आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रंजना मामर्डे, अरूण मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, बर्लावार, पांडुरंग घोटेकर आदी हजर होते.
विदर्भ राज्याचे आंदोलन पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:57 PM
केंद्रात आमची सरकार आली की आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देतो, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमी भाव देऊ, कृषी पंपाचे वीज बिल माफ करू,....
ठळक मुद्देराम नेवले यांची माहिती : खासदारांच्या घरावर नेणार मोर्चा