विदर्भवाद्यांचे आंदोलन : काळी फीत लावून १ मे हा काळा दिवस म्हणून केला साजरागडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ, असे आश्वासन भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र सरकार व सत्ताधाऱ्यांनी हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सोमवारला येथील आठवडी बाजारातील हनुमान मंदिरासमोर ११ जिल्ह्याचा समावेश असलेल्या विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला. तसेच काळी फित लावून १ मे हा दिवस काळा दिवस म्हणून विदर्भवाद्यांनी साजरा केला. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, प्रथम नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, समया पसुला, नगरसेवक रमेश भुरसे, राजू जक्कनवार, जनार्धन साखरे, सुधाकर नाईक, विजय शेडमाके, अमिता मडावी, विवेक चडगुलवार, मुकूंद उंदीरवाडे, कवडू बोरकर, शरद ब्राह्मणवाडे, भास्कर कोठारे, भास्कर बुरे, जितू धात्रक, गजानन गोरे, सुनिल धात्रक, राकेश्वर कोठारे, उमेश उडाण, सत्यनारायण पांडेकर, परशुराम काटवे, वामन नैताम, शंकर भांडेकर, कुपटू बोबाटे, राजू बुरले, गणपत सोनटक्के, वनिता बांबोळे आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, अहेरी तालुका मुख्यालयासह कोरेगाव तसेच इतर मोठ्या गावांमध्ये १ मे हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कुरखेडा येथे विदर्भवाद्यांनी काळ्या फिती लावून रास्ता रोको आंदोलन केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कुरखेडा-वडसा मार्गावरील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमसमोर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन समितीचे पदाधिकारी गणपत सोनकुसरे, वामदेव सोनकुसरे, राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू खुणे, रामचंद्र कोडाप, मुक्ताजी दुर्गे यांच्यासह शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर मडावी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी कुरखेडाचे पोलीस उपनिरिक्षक सुधीर कटारे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आरमोरी येथे विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. यावेळी शालिक नाकाडे, वामनराव जुआरे, सुनिल नंदनवार, भारत बावणथडे, रामभाऊ कुर्झेकर, महेंद्र शेंडे, दिलीप इन्कने, राजू कंकटवार, मिलिंद खोब्रागडे, महादेवराव राऊत, गोपीचंद मने, चांगदेव काळबांधे, विलास गोंदोळे, प्रमोद पेंदाम, शाबीर शेख, गोपाल हिरापुरे, टिक्कू बोंडे आदी उपस्थित होते. यावेळी विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्याचा झेंडा फळकविला. विदर्भवाद्यांनी जिल्हाभरात आंदोलने केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला
By admin | Published: May 02, 2017 1:09 AM