लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन परिक्षेत्रात वाघ, हरीण, निलगाय व बिबट्याचे दर्शन झाले असून यावर्षात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.आरमोरी वन परिक्षेत्रातील रवी, अरसोडा, सुकाळा व इतर काही ठिकाणच्या जंगलात पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका पाणवठ्यावर व्याघ्रदर्शन झाले. तर काही ठिकाणी हरीण, निलगाय, तसेच बिबट्याचे दर्शन झाले. रात्री पाणवठ्यावर तहाण भागविण्यासाठी येणाºया वन्यप्राण्यांमध्ये रानडुकरांचा समावेश होता, असा वन विभागाच्या गणना नोंदणीत उल्लेख आहे. वन विभागाच्या वतीने यापूर्वी झालेल्या प्राणी गणनेत सरपटणारे वन्यजीव, तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठी होती. पण यंदा ससे, घोरपड, मोर, मुंगूस या वन्यजीवांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे दिसून आले. जंगल परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे तसेच वृक्षतोडीमुळे जंगल क्षेत्र कमी झाल्याने प्राण्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे.वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यातगडचिरोली जिल्ह्यात भामरागड, आलापल्ली, सिरोंचा, वडसा व गडचिरोली हे पाच वन विभाग असून ७८ टक्के जंगल आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या राखीव जंगलात विविध कारणामुळे वृक्षतोड सुरू आहे. शिवाय जंगलातील पाणी स्त्रोताची पाणी पातळी खालावल्यामुळे वन्यप्राणी आपली तहाण भागविण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. याचा फायदा काही शिकारी लोक घेत आहेत. वन्यजीवांची अन्न साखळी व निवासस्थाने मानवांकडून हिसकाविण्यात आल्याने वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अवैध शिकार प्रकारामुळेही काही वन्यजीवांचे बळी गेले आहेत. वन विभाग व नागरिकांच्या वतीने वन्यप्राणी संरक्षणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा वन्यजीवांचे दर्शन दुर्मिळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वन्यप्राणी, वन व जैविक विविधतेवर प्रतिकूल परिणाम करणारी कृती थांबविण्यासाठी वन विभागासोबत नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही सर्वांची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत जंगल व जंगलातील वन्यजीवांचे रक्षण करणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. एकदा नष्ट झालेले वने व वन्यप्राणी परत आणू शकणार नाही.- सचिन डोंगरवार,वन परिक्षेत्राधिकारी आरमोरी
वाघ, हरीण व बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:21 PM
वन विभागाच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून वैशाख पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या परिसरात मचान बांधून प्राणी गणना केली जात आहे. यंदाही १९ मे रोजीच्या रात्री चंद्राच्या नितळ व शुभ्र प्रकाशात वैरागड परिसरात प्राणी गणना करण्यात आली. यावेळी आरमोरी वन परिक्षेत्रात वाघ, हरीण, निलगाय व बिबट्याचे दर्शन झाले असून यावर्षात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे.
ठळक मुद्देप्राणी गणना : आरमोरीत वन परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत कमालीची घट