लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विविध स्पर्धा पार पडल्या. त्याचप्रमाणे पोलीस मदत केंद्र व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भाग घेतला.शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी. सी. खांडवाये होते. उद्घाटन सर्व शिक्षा अभियान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुकरू उसेंडी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून जैैनीबाई पोटावी, शांतीबाई कुमरे, माध्यमिक शिक्षक एस. आर. मंडलवार, अधिक्षिका वंदना देवतळे, बी. डी. वाळके, बी. एल. लंजे, वंदना खांडवाये, उपस्थित होते. प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून जनजागृती केली. यावेळी पार पडलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामधून प्रथम क्रमांक काजल कुमरे, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कांचन उसेंडी व शशिता तिगा यांनी पटकाविले. प्राथमिक गटामधून प्रथम क्रमांक रवींद्र कोडाप, द्वितीय अंजली तुमरेटी तर तृतीय क्रमांक नीलिमा पोटावी हिने पटकाविला. खुल्या गटामधून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा कोडाप, द्वितीय अर्चना पोटावी तर तृतीय क्रमांक भाग्यश्री कुमरे हिने पटकाविला. त्याचप्रमाणे निबंध, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमगाव येथील आदिवासी ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्य व नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी तर आभार माध्यमिक शिक्षिका नलिनी कुमरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.पोलीस मदत केंद्र पोटेगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस मदत केंद्र व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. एच. दुधाळ, ्रपं. स. सदस्य मालता मडावी, पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके, सुखदेव सुरपाम, सुधीर शेंडे, शंकर सडमाके, किशोर मुनरातीवार, महेश मुनरातीवार यांच्यासह पोलीस मदत केंद्र व आश्रमशाळेतील कर्मचारी, विद्यार्थी हजर होते.मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून प्रथम क्रमांक राकेश गावळे, द्वितीय दिलीप पोटावी, तृतीय क्रमांक अर्जुन नैैताम यांनी पटकाविला. मुलींमधून प्रथम क्रमांक योगश्री कुमरे, द्वितीय पौर्णिमा नरोटे, तृतीय संगीता पोटावी हिने पटकाविला. मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहायक फौजदार सुधाकर मनबत्तुलवार, पोलीस हवालदार बंडू मारगोनवार, विजय वासेकर, उदयभान जांभुळकर, माधुरी दुपारे यांच्यासह पोलीस व आश्रमशाळेच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
विद्यार्थी व ग्रामस्थांनी घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:42 AM
जागतिक आदिवासी दिनानिमित्त पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विविध स्पर्धा पार पडल्या.
ठळक मुद्देपोटेगावात विविध स्पर्धा : मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी लावली दौड