शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पुतळा बनून स्वागतासाठी उभा राहतो विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:12 AM

एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्याची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे दोन तास स्थिर राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कला सुध्दा मानवाला आकर्षित करु शकते.

ठळक मुद्देकलेतून उदरनिर्वाह । लग्न समारंभात मागणी

विष्णू दुनेदार ।तुळशी : एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्याची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे दोन तास स्थिर राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कला सुध्दा मानवाला आकर्षित करु शकते. अशीच कला देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील एका व्यक्तीकडे असून लग्नसमारंभात पोटासाठी जिवंत माणसाचा पुतळा बनुन स्वागतासाठी उभा राहतो. त्याचे नाव आहे विजय लहानुजी टिकले. ही त्याची अंगभूत कला आता त्याच्यासाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे.विवाह एक संस्कार आहे. मुलीचा विवाह सोहळा प्रत्येक मातापिता आपल्या ऐपतीप्रमाणे आकर्षक करण्याचा प्रयत्न करीत असतात. फुलवारी, आकर्षक विद्युत रोषणाही यासह स्वागतासाठी सज्ज असलेल्या जिवंत माणसाचा पुतळा याची आता क्रेझ वाढली आहे. अशी कला अवगत असलेल्या विजयला लग्न समारंभात स्वागतासाठी हमखास बोलविल्या जात आहे. यासाठी विजय तीन तासाचे आठशे ते हजार रुपये मानधन घेतो. लोक मात्र विजयच्या या कलेचे कौतूक करतात.परसरामजी टिकले यांनी विजयला वेशभूषा उपलब्ध करुन दिली. सुरवातीला अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपली कला दाखवली. त्याची कला जस-जशी कौतूकास पात्र ठरत गेली तसतशी विवाह सोहळ्यात जिवंत माणसाचा पुतळा होऊन स्वागतासाठी मागणी वाढत गेली.आतापर्यंत विजयने जवळपास ३०० विवाह सोहळ्यास उपस्थित राहून आपली कला दाखविली आहे. या कलेने त्याला आजपर्यंत विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदीया या जिल्ह्यासह बालाघाट, छत्तीसगड या ठिकाणी कला दाखविण्यासाठी पोहचवले आहे. विजयची कला रोजगाराचे साधन बनले असून त्याला त्याच्या कुटुंबाचे सहकार्य मिळत आहे.

टॅग्स :artकला