लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : इतर मागास वर्ग, विजाभज व विमाप्र आदी प्रवर्गातील युवक-युवतींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेला ५०० कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.महाज्योतीचे कार्यालय नागपूर येथे सुरू होणार आहे. या संस्थेसाठी व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती झाली असून इतर तीन अशासकीय संचालकांच्या नियुक्त्या लवकरच केल्या जाणार आहे. बार्टी व सारथीसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना ‘महाज्योती’ या संस्थेमार्फत विमाप्र, विजाभज व युवक-युवतींसाठी राबवल्या जाणार आहेत. तसेच बहुजन कल्याण मंत्रालयामार्फत राज्यातील ओबीसी प्रवर्गाला त्यांच्या संख्येनुसार घरकुल योजना तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना व बेरोजगारांना ज्या योजना लागू आहेत, त्या सर्व योजना विजाभज व विमाप्र प्रवर्गातील शेतकऱ्यांना व बेरोजगारांना सुद्धा लागू करण्यात येतील. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नाबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याचेही वडेट्टीवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले. शिष्टमंडळात ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चौधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, प्रकाश सोनवणे, जगदीश म्हस्के, अरुण मुनघाटे, भाऊराव पत्रे, रवींद्र समर्थ हजर होते.
‘महाज्योती’साठी विजय वडेट्टीवार देणार ५०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 6:28 PM
इतर मागास वर्ग, विजाभज व विमाप्र आदी प्रवर्गातील युवक-युवतींच्या प्रशिक्षणासाठी स्थापन झालेल्या ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेला ५०० कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.
ठळक मुद्देबहुजन कल्याणमंत्र्यांची ग्वाही मागास युवक-युवतींसाठी प्रशिक्षण