गुन्हा दाखल केलेल्या आराेपीचे नाव उमाकांत प्रल्हाद बोरकर आहे. नगरी गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत दारूविक्री बंदीचा ठराव पारित केला. या माध्यमातून गावातील दारूविक्रेत्यांना १५ दिवस मुदत देत अवैध दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले होते. सोबतच नोटीसदेखील देण्यात आली होती. मात्र गावातील काही दारूविक्रेत्यांनी ग्रा.पं. ठराव व नोटीसला न जुमानता अवैध व्यवसाय सुरूच ठेवला होता. या दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेने पुढाकार घेतला. शेतशिवारात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून २० लिटर मोहफुलाची दारू जप्त करीत साहित्य नष्ट केले. याप्रकरणी दारूविक्रेत्यावर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार वासुदेव गुरनुले, हवालदार नारायण रायपुरे व गावसंघटनेच्या महिलांनी केली.
गाव संघटनेने नगरीत पकडली २० लिटर दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:33 AM