लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : गावातील दारूविक्री बंद व्हावी, खुलेआम विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व परसवाडी टोला येथील ७२ महिला व पुरुषांनी शनिवारी धानोरा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस उपनिरीक्षकांना मागणीचे निवेदन सदर करून गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथच्या पुढाकाराने नागरिक प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांनी दारूविक्री बंद केली आहे. पण कोरेगाव आणि परसवाडी टोला येथे काही विक्रेते ऐकायला तयार नाही. येथील गाव संघटनेने त्यांना वारंवार सूचना दिल्या आहेत. सातत्याने धाड टाकून अहिंसक कृतीच्या माध्यमातून दारूसाठा, मोहफूल सडवे आणि दारूभट्ट्या गाव संघटनेच्या महिला उद्ध्वस्त करीत असतात. विक्रेत्यांविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु ते जुमानत नाही.अवैध दारूविक्रेते विक्रेते ऐकायला तयार नसल्याने शनिवारी कोरेगाव आणि परसवाडी टोला येथील ७२ महिला व पुरुषांनी धानोरा पोलीस स्टेशन गाठले. दारूविक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांनी गाव संघटनेच्या सदस्यांशी चर्चा केली. निवडणुकीनंतर गावात सातत्याने धाड टाकणार असल्याचे आश्वासन दिले. सोबतच विक्रेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून सज्जड दम देणार असल्याचेही सांगितले.एसडीपीओंचे आश्वासनदारूविक्रेत्यांचा जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे काय करायचे याचा विचार करीत या महिला पोलीस स्टेशनमध्ये बसल्या होत्या. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी त्यांची चौकशी केली. महिलांनी त्यांनाही दोन्ही गावांमध्ये होत असलेल्या दारूविक्रीबाबत सांगितले असता, ‘तुम्ही घाबरू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. दारूविक्री पूर्ण बंद कय’, असे आश्वासन दिले.
गावकऱ्यांची पोलीस ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:15 AM
गावातील दारूविक्री बंद व्हावी, खुलेआम विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आरमोरी तालुक्यातील कोरेगाव व परसवाडी टोला येथील ७२ महिला व पुरुषांनी शनिवारी धानोरा पोलीस स्टेशन गाठले. पोलीस उपनिरीक्षकांना मागणीचे निवेदन सदर करून गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
ठळक मुद्देदारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी : कोरेगाव व परसवाडी टोला येथील नागरिक आक्रमक