भामरागड : नक्षलवाद्यांना मदत करू नका, आपल्याकडे असलेले हत्यार पोलीस ठाण्यात जमा करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हा, असे आवाहन पोलीस व सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थांनी बुधवारी पुन्हा सहा भरमार बंदुका पोलीस अधिकाऱ्यांपुढे पोलीस ठाण्यात जमा केले. १५ दिवसांपूर्वी काही ग्रामस्थांनी लाहेरी उपपोलीस ठाण्यात आपल्याकडील बंदुका जमा केल्या. तसेच दोन दिवसांपूर्वी फोदेवाडा येथील काही ग्रामस्थांनी चार भरमार बंदुका लाहेरी उपपोलीस ठाण्यात जमा केल्या. यावेळी लाहेरी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश घाडगे, सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे कमांडंट सत्येंद्रसिंह ठाकूर, बी. के. शर्मा, राजेंद्रकुमार आदी उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस विभागातर्फे बंदुका जमा केलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांचे पोलिसांना सहकार्य मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)
गावकऱ्यांनी सहा भरमार बंदुका पुन्हा केल्या जमा
By admin | Published: November 03, 2016 2:35 AM