लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सालमारा बिटात एफडीसीएमतर्फे करण्यात येत असलेली वृक्षतोड सालमारा येथील ग्रामस्थांनी थांबविली आहे.पेसा क्षेत्रातील जंगलाची तोड करायची असल्याने ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असताना एफडीसीएमने परवानगी न घेताच शिरपूर, भगवानपूर, सालमारा, सावलखेडा व वैरागड जंगलातील झाडांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात होती. वृक्षतोड अवैध असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी विरोध केला. एफडीसीएम व ग्रामसभा यांच्यावर तोडगा काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात उपवनसंरक्षक कार्यालय देसाईगंज येथे बैठक झाली. या बैठकीत पुढचा निर्णय होईपर्यंत वृक्षतोड केली जाणार नाही, असे ठरविण्यात आले. त्याचबरोबर सदर प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादाकडे न्याय प्रविष्ट असतानाही एफडीसीएमने वृक्षतोड पुन्हा सुरू केली. याची माहिती सालमारा येथील नागरिक गिरीधर वाकडे, माधव नारनवरे, कालिदास वाकडे, सचिन मानकर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी वृक्षतोड थांबवायला लावली. यांनतरही एफडीसीएमच्या मार्फत वृक्षतोड झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जंगल तोडू न देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विचारमंथन केले आहे.
ग्रामस्थांनी थांबविली वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:21 AM
सालमारा बिटात एफडीसीएमतर्फे करण्यात येत असलेली वृक्षतोड सालमारा येथील ग्रामस्थांनी थांबविली आहे. पेसा क्षेत्रातील जंगलाची तोड करायची असल्याने ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक असताना एफडीसीएमने परवानगी न घेताच ....
ठळक मुद्देएफडीसीएमतर्फे झाडांची कत्तल : सालमारा येथील नागरिकांचा विरोध