लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दर दिवशी रूग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. रूग्णालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दर दिवशी जवळपास ७०० ते ८०० रूग्ण उपचारासाठी येत आहेत.१५ दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने वातावरणात दमटपणा निर्माण झाला होता. परिणामी व्हायरल फिव्हरची साथ जिल्हाभरात पसरली. विशेष करून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तापाची साथ पसरल्यानंतर संबंधित व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी, याबाबत फारशी जागृती नसल्याने तापाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रूग्णालयात येणाºया एकूण रूग्णांपैकी जवळपास ९० टक्के रूग्ण ग्रामीण भागातून येत आहेत.भौगोलिक परिस्थितीमुळे येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांचे रुग्ण येतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आंतररूग्ण विभागात नेहमीच गर्दी दिसून येत असली तरी बाह्यरूग्ण विभागात तेवढी गर्दी राहात नाही. मात्र मागील १५ दिवसांपासून व्हायरल फिव्हरची साथ पसरल्याने बाह्य रूग्ण विभागातील प्रत्येक विभागात रूग्णांची रांग लागली असल्याचे दिसून येत आहे.सर्वसाधारणपणे ११ वाजेनंतर चिठ्ठी काढण्याचे प्रमाण कमी होते. मात्र गुरूवारी चिठ्ठी काढण्यासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिकांची मोठी रांग लागली होती. विशेष करून व्हायरल फिव्हरचे प्रमाण लहान बालकांमध्ये अधिक आढळून येत असल्याने ओपीडीतील बाल तपासणी विभागातही गर्दी असल्याचे दिसून येत होते. दर दिवशी १०० बालके तपासणीसाठी येत आहेत. रक्तपेढी, औषध पुरवठा, विभागातही रूग्णांची मोठी गर्दी उसळली होती. काही डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे कार्यरत डॉक्टरांचा ताण वाढला आहे.आंतररूग्ण विभागात जमिनीवर उपचारपावसाळ्यामुळे विविध रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे बाह्य रूग्ण विभागासोबतच आंतर रूग्ण विभागातही मोठी गर्दी आहे. रूग्णांना बेड नसल्याने जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे. काही वार्डांमध्ये तर पाय ठेवायला सुध्दा जागा नसल्याचे दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यात सुमारे २ हजार ७४४ रूग्ण भरती झाले होते. एकदम रूग्णांची संख्या वाढल्याने कार्यरत कर्मचाºयांचाही कामाचा ताण वाढला आहे.१३ दिवसांत ७ हजार ४२१ रूग्णांची तपासणीव्हायरल फिव्हरमुळे रूग्णांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मागील १३ दिवसांत ७ हजार ४२१ रूग्ण बाह्य रूग्ण विभागात दाखल झाले आहेत. दर दिवशी ६०० ते ७०० रूग्णांची तपासणी केली जात आहे. त्यातही मागील पाच दिवसांपासून रूग्णांची संख्या वाढली आहे. ११ सप्टेंबर रोजी ६२१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. १२ सप्टेंबर रोजी ६९३ व १३ सप्टेंबर रोजी ७८३ रूग्ण दाखल झाले आहेत. दर दिवशी रूग्णांचा आकडा वाढत असल्याचे रूग्णालय प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.आॅगस्ट महिन्यात एकूण १४ हजार १२७ रूग्ण बाह्य रूग्ण विभागात दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ४२ रूग्ण व्हायरल फिव्हरचे होते. यापैकी १८२ रूग्णांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना आंतर रूग्ण विभागात भरती करण्यात आले.एकूण रूग्णांमध्ये व्हायरल फिव्हरने ग्रस्त असलेल्या रूग्णांची सर्वाधिक संख्या असल्याचे दिसून येत आहे. सकाळपासून बाह्य रूग्ण विभागात उसळलेली गर्दी दुपारी १ वाजेपर्यंत कायम राहते. त्यानंतर पुन्हा ४ वाजता बाह्य रूग्ण विभाग खोलला जाता. तेव्हाही रूग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याचे दिसून येते.व्हायरल फिव्हर टाळण्यासाठी हात स्वच्छ धुवावे, घरातील फरशी, टाईल्स दर दिवशी पुसून स्वच्छ ठेवावी, ताप आल्यास लगेच रूग्णाला रूग्णालयात भरती करावे. ताप आल्यास साध्या पाण्यात फडके बुडवून रूग्णाचे अंग फडक्याच्या सहाय्याने पुसावे. त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. व्हायरल फिव्हरचा ताप किमान तीन ते चार दिवस राहतो. त्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतर एकाच दिवशी ताप उघडेल, याची अपेक्षा करू नये. बालकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी राहत असल्याने पालकांनी विशेष सावधानी बाळगावी.- डॉ. ज्ञानेश्वर सिरसाम, बालरोगतज्ज्ञ,बाह्य रूग्ण विभाग, जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीदमट वातावरणामुळे व्हायरल फिव्हर वाढला आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये. शिंकताना किंवा जांभई देताना तोंडावर रूमाल घ्यावा. हस्तांदोलन करण्याऐवजी हात जोडून दुरूनच अभिवादन करावे. जंतू संसर्गापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. व्हायरल फिव्हरमध्ये सर्वसाधारणपणे ताप येणे, हात पाय दुखणे, डोका दुखणे, सर्दी, खोकला होणे आदी लक्षणे दिसून येतात. ताप आल्याबरोबर तत्काळ डॉक्टरांकडे उपचार घ्यावा.- डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली
व्हायरल फिव्हरने रूग्णालय फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:01 PM
मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात व्हायरल फिव्हरने थैमान घातले आहे.
ठळक मुद्देदररोज जवळपास ७०० रूग्ण दाखल : तापाने फणफणणाºया ग्रामीण रूग्णांचा लोंढा वाढला