जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम भागातील दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिक घेण्यात येते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. विश्वनाथनगर येथेही गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला.
या वेळी रुग्णांचे अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची माहिती घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले. यशस्वितेसाठी ग्रा. पं. सदस्य अरुणा मंडल, संघटना सदस्य तुलसी मंडल, महाराणी मंडल, जयंती मंडल, प्रेमीला मंडल व जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.